Jio बनला देशाचा नंबर वन ब्रँड, SBI आणि LIC ला टाकलं मागे; जागतिक क्रमवारीत कोण आघाडीवर?
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओने (Jio) एक मोठी कामगिरी केली आहे. Jio ब्रँडने एलआयसी (LIC) आणि एसबीआय (SBI) यासारख्या ब्रँडला या बाबतीत मागे टाकत आघाडी घेतली आहे.

Jio News : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओने (Jio) एक मोठी कामगिरी केली आहे. Jio ब्रँडने एलआयसी (LIC) आणि एसबीआय (SBI) यासारख्या ब्रँडला मागे टाकत आघाडी घेतली आहे. जिओ (Jio) हा 2024 चा भारतातील सर्वात मजबूत ब्रँड बनला आहे. ब्रँड फायनान्सने जारी केलेल्या ‘ग्लोबल-500 2024’ अहवालानुसार Jio सर्वात मजबूत ब्रँड म्हणून उदयास आला आहे.
जगातील सर्वात मजबूत ब्रँडच्या यादीत Jio 17 व्या स्थानावर
‘ग्लोबल-500 2024’ अहवालात दिलेल्या माहितीनुसार, Jio ब्रँड स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) यासारख्या कंपन्यांना मागे टाकून एक मजबूत ब्रँड बनला आहे. दरम्यान, जगातील सर्वात मजबूत ब्रँडच्या यादीत Jio 17 व्या स्थानावर आहे. Jio कंपनीचा ब्रँड सामर्थ्य निर्देशांक 88.9 आहे. WeChat, YouTube, Google, Deloitte, Coca-Cola आणि Netflix या यादीत अव्वल स्थानावर आहेत.
SBI आणि LIC ला जागतिक क्रमवारीत कितवे स्थान?
'ग्लोबल-500 2024' च्या सर्वात मजबूत ब्रँडच्या यादीत, LIC जागतिक स्तरावर 23 व्या क्रमांकावर आहे. तर भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI चे नाव या यादीत 24 व्या स्थानावर आहे. या दोन्ही भारतीय ब्रँडने इंस्टाग्रामला मागे टाकले आहे. अहवालानुसार, WeChat, YouTube, Google, हॉटेल ब्रँड मरिना बे, रोलेक्स, बँक ऑफ चायना, स्विसकॉम, चॅनेल, स्टेट ग्रिड, EY सारख्या अनेक मोठ्या ब्रँडची नावे 25 सर्वात मजबूत ब्रँडच्या यादीत शीर्षस्थानी आहेत. जग
जिओच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 14 टक्क्यांनी वाढ
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओने 2016 मध्ये देशात दूरसंचार सेवा सुरू केली आहे. तेव्हापासून कंपनीने यशाची नवीन शिखरे गाठली आहेत. गेल्या काही वर्षांत दूरसंचार क्षेत्रातील हा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. अहवालानुसार, जिओच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली असून ती 6.1 अब्ज डॉलर्स झाली आहे. त्याचा ब्रँड इंडेक्स स्कोअरही 89 पर्यंत वाढला आहे. याला AAA ब्रँड रेटिंग देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
आता जिओ भारताबाहेर विस्तारणार, श्रीलंकेच्या सरकारी टेलिकॉम कंपनीवर अंबानींची नजर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
