Jharkhand Election Result | भाजपने समाजाचं विभाजन करण्याचा प्रयत्न केला, जनतेने त्यांना नाकारलं : सोनिया गांधी
जात आणि धर्माच्या आधारावर समाजाचं विभाजन करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना जनतेने नाकारलं आहे. झारखंड निवडणुकीच्या निकालावर सोनिया गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली : झारखंडमधील नागरिकांनी भाजपला नाकारत झारखंड मुक्ती मोर्चा, आरजेडी आणि काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत झारखंडच्या जनतेचं विशेष अभिनंदन करत आभार मानले. यावेळी सोनिया गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपच्या विभाजनकारी अजेंड्याला पराभूत केल्याबद्दल झारखंडच्या जनतेचे आभार. सध्याची परिस्थितीतील हा सर्वात मोठा विजय असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलं.
सोनिया गांधी यांनी म्हटलं की, लोकांची जात आणि धर्माच्या आधारावर समाजाचं विभाजन करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना जनतेने पराभूत केलं आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि आरजेडी यांच्या आघाडीला 47 जागा मिळाल्या. झारखंड विधानसभेत 81 जागा असून सत्तास्थापनेसाठी 41 जागांची आवश्यकत असते. त्यामुळे झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि आरजेडी आघाडीचं सरकार येथे स्थापन होणार हे निश्चित आहे. मिळालेल्या माहितीनुसार झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन 28 डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
Congress interim president Sonia Gandhi on #JharkhandAssemblyPolls: With this mandate, the people have defeated BJP’s attempts to divide the society on caste and religious lines. https://t.co/eD8HmoJjtu
— ANI (@ANI) December 23, 2019
झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) 30 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला आहे. काँग्रेसला 16 आणि आरजेडीला एका जागेवर यश मिळालं आहे. तर सत्तेत असलेल्या भाजपला 25 जागांवर रोखण्यात जेएमएम, काँग्रेसला यश मिळालं. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने सहा जागा जिंकल्या होत्या. यावेळी काँग्रेसला 10 जागांचा फायदा झाला आहे. तर आरजेडीने एका जागेवर विजय मिळवला आहे.
आजसूच्या खात्यात दोन जागा आल्या आहेत. 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत आजसूला तीन जागांचा फटक बसला आहे. झारखंड विकास मोर्चालाही (जेव्हीएम) तीन जागांचा फटका बसला आहे. 2014 मध्ये जेव्हीएमने आठ जागा जिंकल्या होत्या, मात्र यावेळी त्यांना तीन जागांवर समाधान मानावं लागलं. सीपीआय (एमएल) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली. तर दोन अपक्ष उमेदवारही निवडून आले आहेत.
2014 आणि 2019 निवडणुकांचे निकाल
पक्ष | 2019 | 2014 |
जेएमएम | 30 | 19 |
काँग्रेस | 16 | 6 |
भाजप | 25 | 37 |
आजसू | 2 | 5 |
जेव्हीएम | 3 | 8 |
राष्ट्रवादी काँग्रेस | 1 | - |
इतर | 4 | 6 |
- Jharkhand Election Results 2019 : महाराष्ट्रानंतर भाजपचं झारखंडमध्येही पानिपत, काँग्रेस-जेएमएम आघाडीला स्पष्ट बहुमत
- Jharkhand Election Results 2019 : भाजप झारखंडच्या जनतेची सेवा करत राहिल; पंतप्रधान नरेंद्र मोदी
- Jharkhand Election Results 2019 : अटीतटीच्या लढाईत सर्वात कमी फरकाने जिंकलेले उमेदवार
VIDEO | Jharkhand Election Results 2019 | झारखंडनेही भाजपला नाकारलं! | माझा विशेष