NEET UG 2022 : दिल्लीच्या जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांची निदर्शने, NTA कडे परीक्षेसाठी आणखी एक संधी देण्याची मागणी
NEET UG 2022 : विद्यार्थी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करताना दिसत आहेत. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी जमण्याची शक्यता आहे.
![NEET UG 2022 : दिल्लीच्या जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांची निदर्शने, NTA कडे परीक्षेसाठी आणखी एक संधी देण्याची मागणी jee mains neet cuet students will protest at jantar mantar over demand one more chance Marathi News NEET UG 2022 : दिल्लीच्या जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांची निदर्शने, NTA कडे परीक्षेसाठी आणखी एक संधी देण्याची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/17/0ec6e5d0be058e6df71b0cbfc3d6a3de1660715424758381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
NEET UG 2022 : NEET UG 2022 परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नासाठी आणि JEE Main 2022 परीक्षेच्या तिसऱ्या प्रयत्नासाठी या दोन्ही प्रवेश परीक्षांसाठी आणखी एक सत्र आयोजित करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून विद्यार्थी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडे करण्यात येत आहे. यासंदर्भात विद्यार्थी सातत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या मागण्या मांडत आहेत. आता हे विद्यार्थी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करताना दिसत आहेत. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी जमण्याची शक्यता आहे. पवन भदाना नावाच्या विद्यार्थ्याने नवी दिल्लीच्या डीसीपींना पत्र लिहून 17 ऑगस्ट रोजी JEE Mains, NEET आणि CUET साठी जंतरमंतरवर आंदोलन करण्याची परवानगी मागितली आहे.
परीक्षेदरम्यान सर्व्हरचा सामना
विद्यार्थ्यांनी NTA ला लिहलेल्या पत्रात असे म्हटलंय की, "JEE, NEET आणि CUET च्या विद्यार्थ्यांना नेटवर्क स्क्रीन हँग, एनईईटीच्या पेपरमध्ये भाषेची समस्या, परीक्षेदरम्यान सर्व्हरच्या समस्यांचा सामना करावा लागला, परंतु NTA कडून कोणत्याही प्रकारच्या समस्याचे निराकरण करण्यात आले नाही. 17 ऑगस्ट म्हणजेच आज सकाळी 10 वाजेपासून विद्यार्थ्यांची निदर्शने जंतरमंतर येथे सुरू करण्यात आली आहेत. NEET UG, JEE Main आणि CUET च्या विरोधाची माहिती अधिकाधिक लोकांना ट्विटरवर सतत दिली जात आहे.
NTA कडे आणखी एका सत्राची मागणी
परीक्षेला बसलेले विद्यार्थी ऑनलाइन मोहिमेद्वारे दोन प्रवेश परीक्षांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडे आणखी एका सत्राची मागणी करत आहेत. परीक्षेदरम्यान नोंदवलेल्या अनियमिततेमुळे, वैद्यकीय इच्छुकांना त्यांचे गुण सुधारण्यासाठी NTA 2022 मध्ये आणखी एक प्रयत्न हवा आहे.
परीक्षांबाबत अनेक घटना समोर
NTA द्वारे घेतलेल्या परीक्षांबाबत अलीकडेच अनेक घटना समोर आल्या आहेत. केरळमधील परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी एका विद्यार्थिनीचे अंतर्वस्त्र काढून टाकण्यास सांगण्यात आले. तसेच जेईई मेन 2022 च्या उमेदवारांची अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत जिथे विद्यार्थी तांत्रिक समस्यांचा सामना करताना दिसले. त्यामुळे जेईई परीक्षेचे विद्यार्थीही परीक्षेची दुसरी संधी शोधत आहेत.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)