LoC Covid Vaccination: बारामुल्लासह जम्मू आणि काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीत लसीकरण मोहीम, प्रचंड हिमवृष्टीतही आरोग्य कर्मचार्यांची सेवा
बारामुल्ला, जम्मू आणि काश्मीरसारख्या बर्फाळ प्रदेशांमध्ये हाडं गोठवणारी थंडी असतानाही बर्फवृष्टी, बर्फाने भरलेल्या रस्त्यांमधून मार्ग काढत आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लसीकरण केले जात आहे.
LoC Covid Vaccination : गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागासह शहरातही आता आरोग्य कर्मचारी घरो-घरी जाऊन लसीकरणासाठी जनजागृती करत आहेत. तर दुसरीकडे बारामुल्ला, जम्मू आणि काश्मीरसारख्या बर्फाळ प्रदेशांमध्ये हाडं गोठवणारी थंडी असतानाही आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लसीकरण केले जात आहे.
बारामुल्ला, जम्मू आणि काश्मीरसारख्या बर्फाळ प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीही होत आहे. त्यामुळे या भागातील थंडीत वाढ झाली आहे. परंतु, सतत होणारी बर्फवृष्टी आणि वाढलेल्या थंडीच्या कडाक्यातही लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने नुकतेच या बर्फाळ प्रदेशात सुरू असलेल्या लसीकरणाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
एएनआयने शेअर केलेल्या व्हिडोओमध्ये प्रचंड थंडी, बर्फवृष्टी, बर्फाने भरलेल्या रस्त्यांमधून मार्ग काढत आरोग्य कर्मचारी खेड्यांमध्ये जाऊन लसीकरण करत असल्याचे दिसत आहे. जम्मू काश्मीरच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लष्कराच्या जवानांच्या मदतीने बर्फवृष्टी असतानाही शनिवारी बारामुल्लाच्या बोनियार येथे नियंत्रण रेषेजवळील गावांमधील नागरिकांचे लसीकरण केले.
Amid snowfall, J&K Health Department carried out a vaccination drive in several villages situated near LoC in Boniyar, Baramulla on Saturday
— ANI (@ANI) January 22, 2022
"Children in 15-18 age group & those eligible for precaution dose were given COVID shots," said Block Medical Officer Dr Parvez Masoodi pic.twitter.com/DetB747vtp
ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. परवेझ मसूदी यांनी सांगितले की, "भारतीय लष्कराने बारामुल्ला येथील बोनियार येथे नियंत्रण रेषेजवळील भागात लसीकरण मोहीम राबविणाऱ्या आरोग्य पथकांना मदत केली. येथील 15 ते 18 वयोगटातील मुले आणि बूस्टर डोससाठी पात्र असलेल्यांना लस देण्यात आली."
#WATCH | Baramulla, Jammu & Kashmir | Healthcare workers carried out vaccination drive amid heavy snowfall with the help of Indian Army in villages near LoC (22.01.22) pic.twitter.com/HC4wZ8OKDH
— ANI (@ANI) January 23, 2022
महत्वाच्या बातम्या
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं निर्बंध, 'या' देशाच्या पंतप्रधानांनी स्वत:चं लग्न पुढं ढकललं
- US Canada Border : चार भारतीयांचा गोठून मृत्यू, बेकायदेशीरपणे अमेरिका-कॅनडा सीमा ओलांडण्याचा प्रयत्न
- Coronavirus Cases Today : सलग दुसऱ्या दिवशी रुग्णवाढ कमी, देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 33 हजार नवे कोरोनाबाधित