एक्स्प्लोर

Deployment of Hindu Kashmiri employees : काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी सरकारचं मोठं पाऊल, कर्मचाऱ्यांना देणार सुरक्षित ठिकाणी काम

सरकारने काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी आता मोठं पाऊल उचललं आहे. काश्मीरमध्ये काम करत असलेल्या हिंदू कर्मचाऱ्यांना सुरक्षित जिल्हे आणि तहसील मुख्यालयात काम दिलं जाणार आहे.

Deployment of Hindu Kashmiri employees :  अलीकडेच काश्मिरी पंडित असरणारे सरकारी कर्मचारी राहुल भट्ट यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्या सरकारी कार्यालयात घुसून ही हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सरकारने काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी आता मोठं पाऊल उचललं आहे. काश्मीरमध्ये काम करत असलेल्या हिंदू कर्मचाऱ्यांना सुरक्षित जिल्हे आणि तहसील मुख्यालयात काम दिले जाणार असल्याची माहिती उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली आहे. तसेच त्यांना पोलिसांची सुरक्षा देखील पोहोचवणार आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले करत आहेत. या घटनेला सरकारने गांभीर्याने घेत आता काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याबाबत उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की, पंतप्रधान पॅकेज अंतर्गत काश्मीरमध्ये काम करत असलेल्या हिंदू कर्मचाऱ्यांना सुरक्षित जिल्हे आणि तहसील मुख्यालयात काम दिले जाणार आहे. यासोबतच जम्मू-काश्मीर पोलीस काश्मिरी हिंदू कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना संपूर्ण सुरक्षा पुरवतील. पंतप्रधान मदत पॅकेज अंतर्गत नियुक्त केलेल्या जवानांच्या कल्याण आणि सुरक्षेशी संबंधित सर्व समस्या टप्प्याटप्प्याने सोडवल्या जातील असेही त्यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात 859 कर्मचारी सुरक्षित जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात येणार 

जम्मू-काश्मीर सरकारच्या नव्या रणनीतीअंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रशासनाकडून 859 कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना 8 ते 10 दिवसांत सुरक्षित जिल्ह्यांमध्ये किंवा तहसीलमध्ये तैनात केले जाईल. एवढेच नाही तर या जवानांसाठी कामाच्या ठिकाणी सर्व सुरक्षेची व्यवस्था करण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत उपराज्यपाल काय म्हणाले?

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत बोलताना उपराज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले की, याबाबत प्रशासकीय सचिवांना सूचना देण्यात आल्या आहेत. ते लवकरच या प्रकरणांमध्ये लक्ष घालतील. तसेच योग्य ती पावले उचलतील. लेफ्टनंट गव्हर्नर सचिवालयातील कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष कक्षही तयार करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, भाजपच्या शिष्टमंडळाने उपराज्यपालांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने काश्मीरी हिंदूंना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर काश्मिरमध्ये काम करणाऱ्या अल्पसंख्याकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget