दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरणी 14 जणांना अटक
Delhi Violence: हनुमान जयंतीनिमित्त 16 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आल्याची घटना दिल्लीतील जहांगीरपुरी येथे घडली होती.
Delhi Violence: हनुमान जयंतीनिमित्त 16 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आल्याची घटना दिल्लीतील जहांगीरपुरी येथे शनिवारी घडली. या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नोंदवण्यात आलेल्या एफआयआरच्या प्रतीनुसार, ही मिरवणूक जहांगीरपूरच्या सी ब्लॉकमधील जामा मशिदीजवळ पोहोचली तेव्हा अन्सार नावाचा एक व्यक्ती त्याच्या चार-पाच साथीदारांसह पोहोचला आणि मिरवणुकीत सामील असलेल्या लोकांशी वाद घालू लागला. यानंतरच वाद वाढत गेला आणि दगडफेक सुरू झाली.
याप्रकरणी बोलताना अन्सारची पत्नी सकिना म्हणाली की, तिचा पती अन्सार दोषी नाही. माझा नवरा दोषी असता तर तो दिल्ली सोडून पळून गेला असता. ती म्हणाले की, आम्ही 12 वर्षांपासून दिल्लीत राहत आहोत, आम्ही कलकत्त्याहून आलो आहोत आणि अनेक वर्षांपासून अनेक हिंदू आमच्या शेजारी राहत आहेत.
सकिनाने सांगितले की, हिंसाचाराच्या वेळी अन्सार घरीच होता. तो मोबाईलचे काम करतो आणि परिस्थिती बिघडल्यावर त्याला फोन आला, त्यामुळे कोणाला तरी वाचवण्याच्या घाईत तो घराबाहेर पडला. सकिनाने सांगितले की, हिंसाचार भडकल्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच दिवशी उशिरा रात्री घरातून घेऊन गेली. दुसरीकडे अन्सारचे हिंदू शेजारी म्हणतात की, तो एक चांगला माणूस आहे. तो भांडण करायला नाही, तर सोडवायला गेला होता. दरम्यान, दिल्ली पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Delhi Violence : दिल्लीच्या जहांगीरपुरीतील गोंधळानंतर उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट, पोलीस प्रशासनाला 'या' सूचना
- Hanuman Jayanti: दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये मिरवणुकीत गोंधळ, दगडफेक आणि तोडफोड; अनेक पोलिसही जखमी
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 975 नवे कोरोना रुग्ण, 4 जणांचा मृत्यू
- MoD Recruitment 2022 : संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी, 'या' पदांवर भरती, 50 वर्षापर्यंतच्या उमेदवारांना करता येणार अर्ज