एक्स्प्लोर

Jagdeep Dhankar Resignation : जगदीप धनखड यांचा राजीनामा, उपराष्ट्रपतींची निवड कशी होते? निवडणूक झाल्यास मतदान कोण करतं? 

Jagdeep Dhankar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. या राजीनाम्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींची निवड कधी होणार याकडे लक्ष लागलं आहे?

नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी काल प्रकृती आणि वैद्यकीय कारणांचा हवाला देत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यामुळं आता भारतीय संविधानाच्या कलम 68 नुसार नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया सुरु होईल. उपराष्ट्रपतींची निवड प्रक्रिया कशी होते ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. जगदीप धनखड यांनी ऑगस्ट 2022 मध्ये व्यंकय्या नायडू यांच्यानंतर उपराष्ट्रपती पद स्वीकारलं होतं. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा देणारे जगदीप धनखड हे तिसरे उपराष्ट्रपती ठरले आहेत. 

उपराष्ट्रपती पदाची निवड प्रक्रिया कशी होते?

संविधानाच्या कलम 68 नुसार उपराष्ट्रपती पद निवडीची प्रक्रिया आहे. कलम 68 (1) नुसार उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ संपंत आला अशेल तर त्यापूर्वी नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.  दुसरी तरतदू अशी आहे जर उपराष्ट्रपती पद मृत्यू, राजीनामा, पदावरुन हटवलं गेल्यानं रिक्त झाल्यास नव्या उपराष्ट्रपतींची नियुक्ती प्रक्रियेद्वारे केली जाते. उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा संविधानात दिलेली नाही.  कलम 68 नुसार जितक्या लवकर उपराष्ट्रपतींची निवड करणं शक्य आहे तितक्या लवकर ती करावी. जगदीप धनखड यांनी 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता, त्यांची अजून दोन वर्ष बाकी होती. मात्र, नव्या उपराष्ट्रपतींची निवड झाल्यानंतर ती पाच वर्षांसाठी असते. 

उपराष्ट्रपती होण्यासाठी पात्रता

भारतीय संविधानाच्या कलम 66(3) अनुसार उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी काही पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक असला पाहिजे. त्यानं वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत. तो राज्यसभेवर निवडून येण्यास पात्र असावा. भारत सरकार, कोणतंही राज्य सरकार किंवा इतर शासकीय प्राधिकरणात लाभाच्या पदावर नसावा. 

उपराष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून राबवली जाते. आयोगाकडून निवडणुकीची अधिसूचना काढली जाते. उमेदवारी अर्जांची छाननी केली जाते. मतदान केलं जातं. त्यानंतर मतमोजणी करुन निकाल जाहीर केला जातो. 

उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार (संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मिळून बनलेल्या निर्वाचक गणाच्या सदस्यांकडून निवडला जाईल) या निवडणुकीतील मतदान गुप्त मतदान पद्धतीनं केलं जातं. 

उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांकडून मतदान केलं जातं. लोकसभा आणि राज्यसभेतील राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केलेले सदस्य देखील यात मतदान करु शकतात. मतदारांना उमेदवारांच्या नावापुढं पसंतीक्रम नोंदवायचा असतो. जोपर्यंत उमेदवार बहुमतानं विजयी होत नाही तोपर्यंत मतमोजणी केली जाते. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget