एक्स्प्लोर

Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड यांचा तडकाफडकी राजीनामा, महाराष्ट्रातील 'या' नेत्याच्या नावाची उपराष्ट्रपतीपदासाठी चर्चा

Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी काल (21 जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजीनामा देताना त्यांनी पंतप्रधानांसह सर्व मंत्रीमंडळाचे आभार मानले. त्यांच्या कार्यकाळाची मुदत ऑगस्ट 2028 पर्यंत होती. मात्र, कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी राजीनामा सादर केल्याने चर्चांना उधाण आले आहे. पदावर असतानाच प्रकृतीच्या किंवा इतर कारणामुळे राजीनामा देऊ करणारे देशाचे पहिले उपराष्ट्रपती, अशी नोंद झालेले राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वीकारणार की नाही? हे लवकर स्पष्ट होणार आहे. तर धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला तर नवे उपराष्ट्रपती कोण होणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. यात महाराष्ट्रातील एका नेत्याचे नाव आघाडीवर आहे.   

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. संसदेच्या सर्व सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम आणि विश्वास नेहमीच माझ्या आठवणीत राहील. देशाच्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला अनेक अनुभव मिळाले यासाठी मी मनापासून आभारी आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आणि अभूतपूर्व विकासाचे साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी असणे ही समाधानाची बाब आहे, असे धनखड यांनी म्हटले आहे. हे पद सोडताना भारताचा जागतिक पातळीवर झालेल्या उदयाचा आणि देशाच्या अभूतपूर्व कामगिरीचा मला अभिमान आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल असेल, असा मला विश्वास आहे. मी मनापासून आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो, असे धनखड यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.  

धनखड यांचं नुकतंच झालेलं हृदयाचं ऑपरेशन

नुकतेच धनखड यांचे एम्समध्ये हृदयाचे ऑपरेशन झाले होते. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसभर किंवा त्याच्याही आधी देशभरात दौरे करताना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा अंदाज कोणालाही आला नव्हता. राज्यसभेत धनखड यांनी दोनदा भाषण देखील केले. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक देखील त्यांच्या दालनात झाली होती. मात्र त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

महाराष्ट्रातील 'या' नेत्याचे नाव आघाडीवर

धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वीकारणार की नाही? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. धनखड यांचा राजीनामा स्वीकारला तर नवे उपराष्ट्रपती कोण होणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. आता त्या परिस्थितीत महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. तर तमिळनाडूचे राज्यपाल रवी किंवा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याही नावाचा या पदासाठी विचार केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला तर नवे उपराष्ट्रपती नेमके कोण होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा  

Jagdeep Dhankhar Resign: उपराष्ट्रपती धनखड यांचा अचानक राजीनामा; 'तो' एक प्रस्ताव अन् सरकारची नाराजी वाढली?, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
मोठी बातमी! प्रवीण दरेकर पुढचे सहकार मंत्री, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; आता, भाजपकडून स्पष्टीकरण
मोठी बातमी! प्रवीण दरेकर पुढचे सहकार मंत्री, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; आता, भाजपकडून स्पष्टीकरण
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे

Embed widget