एक्स्प्लोर

ISRO : इस्त्रोमधील बहुतांशी शास्त्रज्ञ हे दक्षिण भारतीयच का? सायन्स आणि गणिताकडे दक्षिण भारतीयांचा ओढा का? 

Chandrayaan 3: उत्तर भारतीयांचा कल हा IAS, IPS होण्याकडे असतो, तर दक्षिण भारतीय विद्यार्थी हे गणित आणि सायन्स शिकण्याला प्राधान्य देतात.

मुंबई: भारताने स्पेस सायन्समध्ये मोठी भरारी घेतली असून चांद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आहे. यामध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू ते सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि विक्रम साराभाई ते सध्याचे प्रमुख एस सोमनाथ यांच्यासह असंख्य शास्त्रज्ञांनी त्यामध्ये योगदान दिलं आहे. पण इस्त्रोमधील  (ISRO) आतापर्यंतच्या शास्त्रज्ञांच्या नावावरुन नजर फिरवल्यास बहुतांशी शास्त्रज्ञ हे दक्षिण भारतातील असल्याचं दिसून येतंय. 

चांद्रयान-3 यशस्वी करण्यासाठी इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ आणि त्यांच्यासह प्रकल्प संचालक पी वीरमुथुवेल, मिशन डायरेक्टर मोहना कुमार, विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे (व्हीएसएससी) संचालक एस उन्नीकृष्णन नायर, यूआर राव सॅटेलाइट सेंटर (यूआरएससी) संचालक एम शंकरन आणि लॉन्च ऑथोरायझेशन बोर्ड यांचा मोलाचा वाटा होता. (LAB) प्रमुख ए राजराजन यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. 

बहुतांशी संस्था या दक्षिण भारतात 

भारतातील सर्वात पहिले रॉकेट लॉंचिंग स्टेशन हे तिरुअनंतपुरमजवळील थुंबा या ठिकाणी उभारण्यात आलं. त्यानंतर श्रीहरीकोट्टा या ठिकाणीही एक स्टेशन उभं करण्यात आलं. इस्त्रोचे मुख्यालय हे बंगळुरु या शहरात आहे. एवढंच काय तर इस्त्रोसाठी ज्या ठिकाणी शास्त्रज्ञ निर्माण केले जातात, ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अॅंड टेक्नॉलॉजी (Indian Institute of Space Science and Technology IIST) देखील दक्षिण भारतात आहे. आशियातील ही पहिली स्पेस सायन्स युनिव्हर्सिटी ही तिरुअनंतपुरमजवळील वलाईमला या ठिकाणी 2007 साली स्थापन करण्यात आली. स्पेस सायन्समध्ये आवश्यक असणाऱ्या उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण पुरवण्याचं काम ही संस्था करते. 

इस्त्रोमध्ये उत्तर भारतीय शास्त्रज्ञही आहेत, पण त्यांची संख्या कमी असल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच या शास्त्रज्ञांकडून इस्त्रोला 'इडली सांबर रस्सम ऑर्गनायझेशन' असं गमतीने म्हटलं जातं. पण इस्त्रोमध्ये दक्षिण भारतीय शास्त्रज्ञांची संख्या जास्त का आहे? याचे उत्तर हे दक्षिण भारतीय संस्कृती आणि शिक्षणव्यवस्थेत दडलं असल्याचं सांगितलं जातंय. 

शास्त्रज्ञ होण्याकडे दक्षिण भारतीयांचा ओढा का? 

उत्तरेकडील राज्यांमध्ये सरकारी नोकऱ्या, त्यातही आयएएस, आयपीएसकडे ओढा जास्त आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रॅज्युएशन तीन वर्षात पूर्ण केलं जातंय आणि लगेच यूपीएससी आणि एसएससीची तयारी सुरू केली जातेय. त्याचसोबत त्या त्या राज्यांतील स्पर्धा परीक्षांची तयारी केली जाते. यूपीएससी किंवा एसएससीसाठी जर पदवी हीच शैक्षणिक अहर्ता असेल तर ही मुलं इंजिनिअरिंग किंवा मेडिकलसाठी चार-पाच वर्षे का घालवतील? तीन वर्षात पदवी घेऊन थेट दिल्ली गाठतात आणि अभ्यासाची तयारी करतात. त्यासाठी ते आर्ट्स म्हणजे कलेच्या अभ्यासाला प्राधान्य देतात. त्यामुळे गणित, सायन्स या विषयांचा त्या तुलनेने कमी अभ्यास असतो.

याच्या विरुद्ध म्हणजे दक्षिण भारतीय विद्यार्थ्यांचा कल. दक्षिण भारतीय विद्यार्थ्यांचा कल हा सायन्स आणि इंजिनिअरिंगकडे असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे लहानपणापासूनच या विद्यार्थ्यांमध्ये सायन्स आणि गणिताचा अभ्यास चांगल्या पद्धतीने केला जातो. तसेच या विद्यार्थ्यांचे अर्थशास्त्रही चांगलं असतं. इस्त्रोमध्ये भरती व्हायचं असेल तर सायन्स आणि गणित चांगलं असलं पाहिजे. त्यामुळेच दक्षिण भारतीय विद्यार्थ्यांचा कल हा सायन्स, इंजिनिअरिंग आणि मेडिकलकडे जास्त असतो. 

IIT आणि NIT मध्येही मोठी संख्या

देशातल्या सर्वात चांगल्या आयआयटी आणि एनआयटी या दक्षिण भारतात असल्याचं सांगितलं जातंय. आयआयटी आणि एनआयटीमध्ये दक्षिण भारतीय मोठ्या संख्येने असल्याचं दिसून येतंय. 

सायन्स म्हणजे विज्ञानामध्ये दक्षिण भारतीयांचे योगदान मोठं आहे. सी व्ही रमण यांना 1930 सालचा फिजिक्समधील नोबेल पुरस्कार तर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना 1983 सालचा फिजिक्समधील नोबेर पुरस्कार मिळाला आहे. तसेच वेंकटरमण रामकृष्णन यांना 2009 सालचा केमेस्ट्रीमधील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. 

आतापर्यंतचे इस्त्रोचे प्रमुख 

  • डॉ. विक्रम साराभाई
  • एमजीके मेनन
  • सतिश धवन
  • यू आर राव
  • के कस्तुरीरंजन
  • माधवन नायर
  • के राधाकृष्णन
  • किरण कुमार
  • के सिवन
  • एस सोमनाथ 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Embed widget