एक्स्प्लोर

2nd November In History : इस्त्रायल-पॅलेस्टिन वादाचे मूळ असलेला 67 शब्दांचा 'बाल्फोर जाहीरनामा' प्रसिद्ध, किंग खान शाहरूखचा जन्मदिन; आज इतिहासात

2 November In History : ब्रिटिशांनी बाल्फोर जाहीरनाम्याच्या माध्यमातून ज्यू लोकांना पॅलेस्टिमध्ये इस्त्रायल देशाची निर्मिती करण्याचं आश्वासन दिलं. 

मुंबई: आजचा दिवस जगाच्या इतिहासामध्ये सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध (Israel Hamas War) सुरू असून त्यामध्ये सामान्य जनता होरपळली जात आहे. या वादाचे मूळ असलेला बाल्फोर जाहीरनामा (Balfour Declaration) हा आजच्या दिवशी म्हणजे 2 नोव्हेंबर 1917 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. याच जाहीरनाम्याच्या माध्यमातून ब्रिटिशांनी पॅलेस्टिन अरबांची जमीन ज्यू लोकांना देण्याचं जाहीर केलं. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर हा जाहीरनामा प्रत्यक्षात आला आणि 1948 साली इस्त्रायल या देशाची निर्मिती झाली. केवळ 67 शब्दांच्या असलेल्या या जाहीरनाम्याने जगाचा इतिहासच नव्हे तर भूगोलही बदलला. तसेच आजच्याच दिवशी बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा जन्मदिनही (Shah Rukh Khan Birth) आहे. 

1834 : भारतीय मजुरांचे अॅटलस जहाज मॉरिशसला पोहोचले

भारतीय मजुरांना घेऊन जाणारे अॅटलस जहाज 2 नोव्हेंबर 1834 रोजी मॉरिशसला पोहोचले. या दिनाच्या प्रित्यर्थ 2 नोव्हेंबर हा दिवस मॉरिशसमध्ये 'प्रवासी दिन' म्हणून साजरा केला जातो. आज मॉरिशस जो काही आहे त्याचे मोठे श्रेय तिथे गेलेल्या भारतीय मजुरांना दिले जाते. त्यांनी आपल्या मेहनतीने या देशाला नवी ओळख दिली आहे. 1834 ते 1924 या काळात ब्रिटिशांनी भारतातून अनेक मजूर मॉरिशसला नेले.  

1917 : ब्रिटनने बाल्फोर घोषणापत्र जारी केले

पॅलेस्टाईनच्या (Palestine) भूमीत ज्यू लोकांच्या इस्त्रायल (Isreal) या देशाला मान्यता देणाऱ्या बाल्फोर डिक्लेरेशन (Balfour Declaration) म्हणजे बाल्फोर जाहीरनाम्याची घोषणा 2 नोव्हेंबर 1917 रोजी करण्यात आली. 29 सप्टेंबर 1923 रोजी लिग ऑफ नेशन्सने या कराराला मान्यता दिली होती. त्यानंतर ब्रिटनचे तत्कालीन परराष्ट्र सचिव सर ऑर्थर बाल्फोर यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यांच्या नावानेच या जाहीरनाम्याला बाल्फोर डिक्लेरेशन म्हटलं गेलं. 

केवळ 67 शब्दाच्या बाल्फोर जाहीरनाम्याने जगाचा इतिहास आणि भूगोल बदलला. या जाहीरनाम्यामुळे अरब देशांमध्ये एक प्रकारचा असंतोष पसरला. अरब आणि इस्त्रायल यांच्या वादाचा आरंभबिंदू म्हणून या जाहीरनाम्याकडे पाहिलं जातं. नंतरच्या काळात, 1948 रोजी इस्त्रायल देश अस्तित्वात आल्यानंतर हा वाद आणखीनच वाढला. 

1936 : BBC ते पहिले चॅनेल सुरू

ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (BBC) अधिकृतपणे त्यांचे पहिले चॅनेल लॉन्च केले. बीबीसीची जगातील पहिली नियमित दूरदर्शन सेवा देण्यास 2 नोव्हेंबर 1936 पासून सुरूवात झाली.  BBC चे मुख्यालय लंडन येथे आहे.  हा जगातील सर्वात जुना राष्ट्रीय माध्यम समूह आहे. 18 ऑक्टोबर 1922 रोजी लंडनमध्ये याची औपचारिक स्थापना झाली. 14 नोव्हेंबर 1922 रोजी बीबीसीने आपली पहिली रेडिओ सेवा सुरू केली होती.

1950 : लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे  निधन  

जॉर्ज बर्नार्ड शॉ (George Bernard Shaw)हे नोबेल पारितोषिक विजेते लेखक होते. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म 26 जुलै 1856 रोजी डब्लिन येथे झाला. तर  2 नोव्हेंबर 1950 रोजी वयाच्या 94 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आर्म्स अँड द मॅन हे त्यांचे प्रसिद्ध नाटक आहे.

1976 : जिमी कार्टर अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष 

जिमी कार्टर यांनी 2 नोव्हेंबर 1976 रोजी अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ते 1976 ते 1980 पर्यंत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी होते. अध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी युनायटेड स्टेट्स नेव्हीमध्ये नोकरी केली. शिवाय जॉर्जियामध्ये सिनेटर म्हणून काम केले. राष्ट्राध्यक्षपदानंतर ते मानवाधिकार संघटना आणि परोपकारी संस्थांशी जोडले गेले. त्यांना 2002 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.  

1965 : किंग खान शाहरुख खानचा जन्मदिन (Shah Rukh Khan Birth)

बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेल्या शाहरूख खानचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी झाला. दिल्लीत जन्मलेला शाहरुखने टेलिव्हिजनवरील मालिकांमधून अभिनयाचा प्रवास सुरू केला. दिवाना या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 'डर', 'अंजाम' आणि 'बाजीगर' सारख्या काही चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या.

'राजू बन गया जंटलमन', फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'डुप्लिकेट' किंवा 'देवदास', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'माय नेम इज खान' आणि 'चक दे' सारख्या चित्रपटांमधूल शाहरूख घराघरात पोहोचला. शाहरुख खानने 'रईस' आणि 'डॉन' सारख्या चित्रपटात गँगस्टरची भूमिका साकारली. शाहरुख खान तीन दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये असून हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.   

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषदZero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Embed widget