एक्स्प्लोर
रॉ, आयबी, एनएसजी... 8 बॅचमेट्सच्या हाती देशाची सुरक्षा
राष्ट्रीय तपास यंत्रणा, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलिस, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे प्रमुख हे 1984 बॅचचे आहेत.
नवी दिल्ली : गुप्तचर यंत्रणा आणि रिसर्च अॅनालिसिस विंग म्हणजेच रॉच्या नव्या प्रमुख नियुक्तीसोबतच भारताच्या सुरक्षा प्रमुखांबाबत रंजक योगायोग पाहायला मिळत आहे. एनआयए, बीएसएफपासून सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीपर्यंत सगळ्याच प्रमुख पदांवर 1984 बॅचच्या आयपीएस अधिकाऱ्यांचा दबदबा आहे. हा योगायोगच आहे की, राष्ट्रीय तपास यंत्रणा, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलिस, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे प्रमुख हे 1984 बॅचचे आहेत.
यापैकी बहुतांश अधिकाऱ्यांची संबंधित दलात आणि यंत्रणांमध्ये महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 2017 पासून हा सिलसिला सुरु झाला, जेव्हा 1984 बॅचचे आसाम-मेघालय केडरचे अधिकारी वायसी मोदी यांची सप्टेंबर राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक म्हणून नेमणूक झाली होती. यानंतर अनेक अधिकाऱ्यांची नेमणूक झाली, जे 1984 बॅचचेच होते. आता या अधिकाऱ्यांना 'लकी क्लास ऑफ 84' म्हटलं जात आहे.
सामंत कुमार गोयल नवे रॉ प्रमुख, अरविंद कुमार यांच्यावर आयबीची जबाबदारी
वायसी मोदी यांच्यानंतर जानेवारी 2018 मध्ये तेलंगणा केडरचे सुदीप लखटकिया यांची नॅशनल सिक्युरिटी गार्ड अर्थात एनएसजीच्या संचालकपदी नियुक्ती झाली. यानंतर तीन महिन्यानंतरच बिहार केडरचे अधिकारी राजेश रंजन यांना एप्रिल 2018 मध्ये सीआयएसएफचे महासंचालक बनवण्यात आलं. सीआयएसएफचे प्रमुख बनण्याआधी ते बीएसएफमध्ये विशेष महासंचालक होते.
हे आहेत एकाच बॅचचे अधिकारी
NIA वायसी मोदी
NSG सुदीप लखटकिया
CISF राजेश रंजन
BSF रजनीकांत मिश्रा
ITBP एसएस देसवाल
BCAS राकेश अस्थाना
RAW सामंत गोयल
IB अरविंद कुमार
लकी क्लास ऑफ 84
रजनीकांत मिश्रा यांच्यापासून राकेश अस्थाना यांच्यापर्यंत 'लकी क्लास ऑफ 1984' हा सिलसिला पुढेही सुरु राहिला आणि पाच महिन्यांनंतर 1984 बॅचचे यूपी केडरचे अधिकारी रजनीकांत मिश्रा यांची बीएसएफ प्रमुख म्हणून नेमणूक झाली. मिश्रा यांच्यानंतर हरियाणा केडरचे अधिकारी एस एस देशवाल यांना आयटीबीपीचे प्रमुख बनवण्यात आलं. आयटीबीपीचे प्रमुख बनण्याआधी ते बीएसएफचे प्रमुख होते. जानेवारीमध्ये गुजरात केडरचे अधिकारी राजेश अस्थाना यांना नागरी उड्डाण सुरक्षा संचालनालयाचे महासंचालक म्हणून नेमणूक करण्यात आली.
रॉ आणि आयबीमध्ये 'लक'
1984 बॅचच्या अधिकाऱ्यांचं हे 'लक' पुन्हा एकदा दिसलं, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामंत गोयल यांना रॉचे प्रमुख बनवलं आणि त्यांचेच बॅचमेट अरविंद कुमार यांची आयबीचे संचालक म्हणून नियुक्ती केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement