एक्स्प्लोर

भारतातील पहिल्या चावी आँकोलॉजी इमेज बँकेची स्थापना, कॅन्सरवरील संशोधनाला मिळणार चालना 

key Oncology Image Bank : चावी ही भारतातील आँकोलॉजिकल (कॅन्सरविषयक) इमेजिंगला पूर्णपणे समर्पित अशी भारतातील पहिलीच इमेजिंग बायोबँक आहे.

कोलकाता : भारतातील पहिल्या चावी या आँकोलॉजी इमेज बँकेची (key Oncology Image Bank) स्थापना  करण्यात आली आहे. चावी या आँकोलॉजी इमेज बँकेच्या स्थापनेमुळे  कॅन्सरवरील (Cancer) समन्वयात्मक संशोधनाला चालना मिळणार आहे. कोलकाता येथील टाटा मेडिकल आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), खरगपूर यांनी याची स्थापना केली आहे . भारतातील पहिली पूर्णपणे सुस्पष्ट, सुसंबद्ध, कोणाचीही ओळख उघड न करणारी (डी-आयडेंटिफाइड) कॅन्सर इमेज बँक म्हणजे चावी असणार आहे. भारतातील दोन अव्वल संस्थांमधील अशा प्रकारच्या पहिल्याच संशोधन सहयोगाचे उद्घाटन कोलकाता येथे नुकतेच पार पडले. चावी कॉम्प्रिहेन्सिव अर्काइव्ह ऑफ इमेजिंगच्या स्थापनेमुळे भारतातील कॅन्सरवरील संशोधनाला मोठा आधार मिळाला आहे. यामुळे जगभरातील शास्त्रज्ञांना रुग्णांच्या डी-आयडेंटिफाइड प्रतिमा व आवश्यक क्लिनिकल माहिती सहज उपलब्ध होईल आणि त्यांचा उपयोग संशोधनासाठी केला जाऊ शकेल. 

काय आहे चावी? 

चावी ही भारतातील आँकोलॉजिकल (कॅन्सरविषयक) इमेजिंगला पूर्णपणे समर्पित अशी भारतातील पहिलीच इमेजिंग बायोबँक आहे. या प्रकल्पाची आखणी कोलकात्याचे टाटा मेडिकल सेंटर आणि आयआयटी खरगपूर यांच्यातील संशोधन सहयोग म्हणूनच करण्यात आली आहे. नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाचा (एनडीएलआय) (National Digital Library of India (NDLI)) भाग म्हणून तिचा विकास करण्यात आला आहे. देशभरात उपलब्ध असलेली आणि भारतातील प्रमुख कॅन्सर संशोधन संस्थांमधील भविष्यकाळातील सहयोगात्मक संशोधनाचा पाया घालून देणे आणि एक इमेज बायोबँक विकसित करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांना चावीमधील समृद्ध इमेजिंग डेटाच्या वापरास प्रोत्साहन देईल. 

'एआय-रेडिओमिक संशोधन वाढवणार'

“रुग्णाची काळजी घेण्यासाठी डिजिटल इमेजिंगमधील डेटा खूपच महत्त्वाचा असतो. शिवाय सध्या उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानामुळे रुग्णांमधील निष्पत्ती सुधारण्याच्या दृष्टीने भविष्यकाळातील संशोधनासाठी तो एक पार्श्वभूमी तयार करू शकतो. यामुळे सध्याच्या उपचार पद्धतींच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन करणेही शक्य होते. आयआयटी खरगपूरमधील सहकाऱ्यांच्या सहयोगाने टाटा मेडिकल सेंटरमध्ये विकसित करण्यात आलेली चावी स्पष्टीकरणासह साठवलेल्या डिजिटल कॅन्सरविषयक इमेजिंगचा मुक्तपणे उपयोग करून, एआय-रेडिओमिक संशोधन वाढवण्यासाठी आम्हाला व्यासपीठ देत आहे, अशी माहिती कोलकात्याच्या टाटा मेडिकल सेंटरचे संचालक डॉ. पी अरुण यांनी दिली.  

'पूर्वी उपलब्ध नसलेल्या डेटाचा वापर शक्य होणार'

“चावी या संकल्पनेकडे हे कॅन्सरशी निगडित प्रतिमांचे एक अनन्यसाधारण, सर्वसमावेशक डिजिटल आर्काइव्ह  म्हणून बघितले आहे. यामुळे रुग्णांमधील निष्पत्ती सुधारण्यात मदत करणारी पूरक माहिती उपलब्ध होणार आहे. टाटा मेडिकल सेंटर व आयआयटी खरगपूर यांच्यातील हे आम्ही कार्यान्वित केलेले सहयोगात्मक काम आता एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचले आहे. हा साठा आता कार्यात्मक करण्यात आला आहे. यामुळे आता जगभरातील संस्थांमध्ये लक्षणीय सहयोगात्मक कामांना वाट मिळायला हवी. भारतातील चावी ही अशी पहिलीच मुक्त प्रवेश असलेली डेटाबँक आहे. यामुळे या प्रदेशातील पूर्वी उपलब्ध नसलेल्या डेटाचा वापर शक्य होणार आहे, रेडिओमिक संशोधनाला यामुळे आवश्यक वांशिक वैविध्य प्राप्त होणार आहे आणि रुग्णांवरील उपचारांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी उपलब्ध ओमिक्स डेटाला ही माहिती पूरक ठरणार आहे, अशी माहिती आयआयटी खरगपूरचे माजी संचालक आणि आयआयटी खरगपूरमधील कम्प्युटर सायन्सेस विभागातील प्राध्यापक पार्थ प्रतिम चक्रवर्ती यांनी दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha  Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 9 PM : 1 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaGopal Shetty : बोरिवलीतून लढण्यावर गोपाळ शेट्टी ठामKshitij Patwardhan : पडद्यामागचा सिंघम क्षितिज पटवर्धन याच्याशी खास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget