Pune Swargate Datta Gade : किर्ररर काळोख, Dog Squad ची मदत; नराधम कसा अडकला? अटकेचा A टू Z थरार
Pune Swargate Datta Gade : किर्ररर काळोख, Dog Squad ची मदत; नराधम कसा अडकला? अटकेचा A टू Z थरार
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आले आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याच्या शिरूर तालुक्यतील त्याच्या मुळगावी गुनाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. फरार झाल्यापासून तो उसाच्या फडात लपून बसला होता अशी माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस पथके त्याच्या मागवर होती. तब्बल अडीचशेपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता, तर नराधम गाडेला पकडून देण्यासाठी स्थानिक नागरिकांची पोलिसांनी मदत घेतली.
ज्या शेतात दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरु होतं तिथं तो नव्हताच, तिथं तो सापडलाच नाही. दत्ता गाडे रात्री नोतेवाईक महेश बहिरटी यांच्या घरी साडे दहा वाजता आला. त्यानंतर तो आल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली.दत्ता गाडेने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली. आणि माझी मोठी चुक झालीय, मला सरेंडर करायचं असं सांगून तिथुन निघुन गेला. त्यानंतर पोलीसांनी या घराच्या परीसरात दत्ता गाडेचा शोध सुरु केला. डॅाग स्कॅाड ही त्या ठिकाणी आणले.पोलीसांना त्याचा बदलेला शर्ट सापडला , त्याचा वास डॅाग स्कॅाडला दिला. त्याआधारे डॅाग स्कॅाडने पुढील रस्ता पोलीसांना दाखवला , पण गाडे ज्या ठिकाणावरून आला होता तिथे परतलाच नाही. तर तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनलमध्ये झोपून राहीला. याच ठिकाणी तो ग्रामस्थांना आढळला. ग्रामस्थांनी तो दत्ता गाडेच असल्याचं स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं.दत्ता गाडे ताब्यात आल्यानंतर पोलिसांनी लगेचच पुण्याकडे कुच केली.



















