एक्स्प्लोर

Birsa Munda : आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी लढणारे महान क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्याविषयी थोडक्यात...

Birsa Munda Death Anniversary : बिरसा मुंडा यांना आदिवासी समाजात देवाचं स्थान प्राप्त आहे. त्यांनी झारखंड, बिहार, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालच्या आदिवासींच्या हक्कांच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिलं.

Birsa Munda Death Anniversary : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारक आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे बिरसा मुंडा यांची आज पुण्यतिथी. केवळ 24 व्या वर्षी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या बिरसा मुंडांनी एक वेगळीच छाप उमटवली आहे. 

1857 चा उठाव दडपल्यानंतरही भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात ब्रिटिशांविरोधात उठाव सुरु झाले होते. त्यामध्ये 1895 ते 1900 सालाच्या दरम्यान मध्य भारतातील, छोटा नागपुरच्या प्रदेशात बिरसा मुंडा यांनी सुरु केलेली 'उलगुलान' चळवळ ही महत्वाची आहे. देशावर राज्य करणारे इंग्रज आणि आदिवासींचे धर्मांतर करणारे मिशनरी या दोघांच्या विरोधात लढा देण्यात बिरसा मुंडा यांनी आपले जीवन व्यतीत केलं. 

ब्रिटिशांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी आदिवासींच्या जंगलावर अतिक्रमण करायला सुरुवात केली. त्यावेळी आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी बिरसा मुंडे पुढे आले. आदिवासी अस्मिता, आदिवासी संस्कृती आणि स्वायत्तता यांच्या रक्षणासाठी त्यांनी क्रांतीचे हत्यार उचललं. त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी उलगुलान चळवळ सुरु केली. त्या दरम्यान बिरसा मुंडा आणि ब्रिटिशांमध्ये अनेकवेळा चकमकी झाल्या. 

शेवटी जानेवारी 1900 डोंबरीच्या पर्वतावर त्यांच्यामध्ये आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या चकमकीत त्यांना अटक करण्यात आली. या चकमकीदरम्यान अनेक स्त्रिया आणि बालकांचा मृत्यू झाला. ब्रिटिशांनी बिरसा मुंडा यांना तुरुंगात टाकलं आणि तिथेच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. ब्रिटिशांनी त्यांना विषप्रयोग करुन मारलं असं अनेक अभ्यासकांना मत नोंदवलं आहे. 

बिरसा मुंडा यांना आदिवासी समाजात देवाचं स्थान प्राप्त आहे. त्यांनी झारखंड, बिहार, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या आदिवासींच्या हक्कांच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिलं. बिरसा मुंडा यांच्या या योगदानाची दखल घेत भारत सरकारने संसदेत त्यांचे चित्र लावलं आहे. बिरसा मुंडा हे एकमेव आदिवासी नेते आहेत ज्यांचे चित्र संसदेत लावण्यात आलं आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde : संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेटला पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन
आधार कार्ड एक रुपया न देता अपडेट करा, पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या शेवटची तारीख 
India vs Australia 3rd Test : गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
Aaditya Thackeray : भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi On BJP : संविधान रक्षणावर भाजपवाले बोलतात तेव्हा सावरकरांचा अपमान करतातAllu Arjun PC After Bail '  अटक... जेल...जामीन...पुष्पाची पहिली पत्रकार परिषदNana Patole PC : मलाईदार खात्यांसाठी महायुतीत भांडण, नाना पटोलेंचा हल्लाबोलDadar Hanuman Mandir : मोठी बातमी! दादरमधील हनुमान मंदिर  हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde : संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेटला पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन
आधार कार्ड एक रुपया न देता अपडेट करा, पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या शेवटची तारीख 
India vs Australia 3rd Test : गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
Aaditya Thackeray : भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
Rahul Gandhi : पेपरलीक, मक्तेदारी करा, अग्निवीर असावेत, देशातील तरुणांचे अंगठे कापले जावेत, असं संविधानात लिहिलेलं नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
पेपरलीक, मक्तेदारी करा, अग्निवीर असावेत, देशातील तरुणांचे अंगठे कापले जावेत, असं संविधानात लिहिलेलं नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Kapoor : पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
Nana Patole : काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले,  'त्याची चर्चा करण्याची गरज...'
काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले 'त्याची चर्चा करण्याची गरज...'
Delhi Farmer Protest : शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
Embed widget