(Source: Poll of Polls)
9th June 2022 Important Events : 9 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
9th June 2022 Important Events : जून महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या.
9th June 2022 Important Events : जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 9 जून चे दिनविशेष.
1964 : भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी सूत्रे हाती घेतली.
लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. पंडित नेहरूंच्या निधनानंतर काँग्रेसच्या संसदीय सभेने 9 जून 1964 रोजी शास्त्रींची पंतप्रधान म्हणून एकमताने निवड केली.
1696 : छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडुतील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न झाले. मुलाचे नाव ’शिवाजी’ असे ठेवले.
1906 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लंडनला प्रयाण.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी आणि लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते. एल्एल्.बी. झाल्यानंतर लंडनमध्ये बॅरिस्टरीचे शिक्षण घेण्यासाठी 9 जून 1906 ह्या दिवशी सावरकरांनी भारताचा किनारा सोडला.
1977 : अभिनेत्री अमिशा पटेलचा जन्म.
अमिशा पटेल ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आणि निर्माती आहे. अमेरिकेच्या बॉस्टन शहरामधील टफ्ट्स विद्यापीठामधून पदवी घेतलेल्या अमिशाने 2000 सालच्या कहो ना... प्यार है ह्या चित्रपटामध्ये ऋतिक रोशनच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
1985 : अभिनेत्री सोनम कपूरचा जन्म.
1716 : शिख सेनापती बंदा सिंग बहादूर यांचे निधन.
1834 : अर्वाचीन बंगाली आणि मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचे निधन.
1900 : आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा ब्रिटिशांच्या कैदेत संशयास्पदरित्या मृत्यू.
1988 : अभिनेते गणेश भास्कर अभ्यंकर ऊर्फ विवेक यांचे निधन.
1993 : बंगाली आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक सत्येन बोस यांचे निधन.
महत्वाच्या बातम्या :