Rahul Gandhi : पेपरलीक, मक्तेदारी करा, अग्निवीर असावेत, देशातील तरुणांचे अंगठे कापले जावेत, असं संविधानात लिहिलेलं नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
यूपीमध्ये संविधान नसून मनस्मृती लागू करण्यात आल्याचा घणाघात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. संविधान चर्चेवर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
Rahul Gandhi : मी काही दिवसांपूर्वी हातरसला गेलो होतो, तिथे एका मुलीवर चार वर्षांपूर्वी बलात्कार झाला. सामूहिक बलात्कार होतो, हे काम तीन-चार लोक करतात. दोन-तीन दिवसांपूर्वी मी मुलीच्या कुटुंबीयांच्या घरी गेलो. ज्यांनी सामूहिक बलात्कार केला ते बाहेर फिरत आहेत. मुलीचे कुटुंबीय त्यांच्या घरात कोंडून आहेत. बाहेर जाता येत नाही. गुन्हेगार त्यांना दररोज धमकावून बाहेर फिरतात. कुटुंबीयांनी मला सांगितले की त्यांच्या मुलीचे अंतिम संस्कार देखील करू दिले नाहीत. मुख्यमंत्री उघडपणे मीडियासमोर खोटे बोलले, यूपीमध्ये संविधान नसून मनस्मृती लागू करण्यात आल्याचा घणाघात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. संविधान चर्चेवर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
दिल्लीबाहेर तुम्ही शेतकऱ्यांवर लाठीमार केला
ज्याप्रमाणे एकलव्याने सराव केला होता, त्याचप्रमाणे भारतातील तरुण पहाटे 4 वाजता उठतात आणि परीक्षेची तयारी करतात. पूर्वी हजारो तरुण सकाळी उठून सैन्यात भरती होण्यासाठी धावत, प्रशिक्षण घेत असत. त्या तरुणांचे अंगठे पेपरलीक्स, अग्निवीरने कापले आहेत. दिल्लीबाहेर तुम्ही शेतकऱ्यांवर लाठीमार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या. तुम्ही अदानी-अंबानींना फायदा करून देता आणि शेतकऱ्यांचे नुकसान करता. आम्ही म्हणतो घाबरू नकोस, तुम्ही म्हणत आम्ही तुझा अंगठा कापून टाकू. मनमानी व्हावी, पेपर फुटला पाहिजे, अग्निवीर असावा असे घटनेत कुठेही लिहिलेले नाही. भारतातील तरुणांचे अंगठे कापून त्यांच्या कौशल्यापासून वंचित राहावे, असे राज्यघटनेत लिहिलेले नाही.
कांग्रेस और INDIA गठबंधन संविधान के रक्षक हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 14, 2024
भाजपा और RSS मनुस्मृति के समर्थक हैं।
देश संविधान से चलेगा, मनुस्मृति से नहीं! pic.twitter.com/ExD3en1urn
बलात्कार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला कोंडून ठेवावे, असे घटनेत कुठे लिहिले आहे?
राहुल गांधी म्हणाले की, गुन्हे करणाऱ्यांनी बाहेरच राहावे, बलात्कार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला कोंडून ठेवावे, असे घटनेत कुठे लिहिले आहे? हे मनुस्मृतीत लिहिले आहे, तुमच्या पुस्तकात लिहिलं आहे. यूपीमध्ये तुमचा नियम आहे असे म्हणता, मग तिथे मनुस्मृती लागू केली जाते. यूपी सरकारने त्यांना आश्वासन दिले होते की आम्ही तुम्हाला इतरत्र स्थलांतरित करू, तुम्हाला इतरत्र राहण्यासाठी जमीन देऊ. 4 वर्षे झाली, त्यांचे स्थलांतर झाले नाही. बाहेर आल्यावर बलात्कारी धमक्या देतात.
धारावीतील उद्योगपती आणि छोट्या व्यावसायिकांचा अंगठा कापला
राहुल यांनी सांगितले की, अंगठ्यामुळे अभय मुद्रामध्ये आत्मविश्वास येतो. हे लोक विरोधात आहेत. जसा द्रोणाचार्याने एकलव्याचा अंगठा कापला, तसाच तुम्ही देशाचा अंगठा कापण्यात व्यस्त आहात. अदानींना धारावी देताना तुम्ही धारावीतील उद्योगपती आणि छोट्या व्यावसायिकांचा अंगठा कापलात. तुम्ही बंदरे, विमानतळ, संरक्षण उद्योग अदानींना दिले आणि सर्व प्रामाणिक उद्योगपतींचे अंगठे कापले. राज्यघटनेत लॅटरल एन्ट्री करून तुम्ही तरूण, मागासलेले आणि गरीबांचे नुकसान करत आहात.
#WATCH | During discussion on 75th anniversary of adoption of the Constitution of India, Lok Sabha LoP Rahul Gandhi says, "This is Abhayamudra. Confidence, strength and fearlessness come through skill, through thumb. These people are against this. The manner in which Dronacharya… pic.twitter.com/nIropoeCfq
— ANI (@ANI) December 14, 2024
इतर महत्वाच्या बातम्या