Rahul Gandhi On BJP : संविधान रक्षणावर भाजपवाले बोलतात तेव्हा सावरकरांचा अपमान करतात
Rahul Gandhi On BJP : संविधान रक्षणावर भाजपवाले बोलतात तेव्हा सावरकरांचा अपमान करतात
मी काही दिवसांपूर्वी हातरसला गेलो होतो, तिथे एका मुलीवर चार वर्षांपूर्वी बलात्कार झाला होता. सामूहिक बलात्कार होतो. हे काम तीन-चार लोक करतात. दोन-तीन दिवसांपूर्वी मी मुलीच्या कुटुंबीयांच्या घरी गेलो होतो. ज्यांनी सामूहिक बलात्कार केला ते बाहेर फिरत आहेत. मुलीचे कुटुंबीय त्यांच्या घरात कोंडून आहेत. बाहेर जाता येत नाही. गुन्हेगार त्यांना दररोज धमकावून बाहेर फिरतात. कुटुंबीयांनी मला सांगितले की त्यांच्या मुलीचे अंतिम संस्कार देखील करू दिले जात नाहीत. मुख्यमंत्री उघडपणे मीडियासमोर खोटे बोलले, यूपीमध्ये संविधान नसून मनस्मृती लागू करण्यात आल्याचा घणाघात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. संविधान चर्चेवर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.