(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | भारताच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाची लस बनवण्याचा विडा उचलावा : मोदी
कोरोनाची लस तयार करण्यासाठी सुमारे 50 देशांमध्ये संशोधन चालू आहे. त्यातच आता पंतप्रधानांनी भारतीय शास्त्रज्ञांना कोरोनाची लस शोधण्याचं आवाहन केलं आहे.
नवी दिल्ली : कोरोनाची लस बनवण्याचं आव्हान भारताच्या तरुण शास्त्रज्ञांनी, डॉक्टरांनी स्वीकारावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान मोदींनी आज देशाला उद्देशून भाषण केलं. यावेळी त्यांनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवल्याची घोषणा केली. या भाषणातच मोदींनी भारताच्या युवा शास्त्रज्ञांना कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचा विडा उचलण्याचं आवाहन केलं.
जगभरातील 19 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्याप कोणत्याही देशाला या विषाणूवर लस शोधता आलेली नाही. लस तयार करण्यासाठी सुमारे 50 देशांमध्ये संशोधन चालू आहे. त्यातच आता पंतप्रधानांनी भारतीय शास्त्रज्ञांना कोरोनाची लस शोधण्याचं आवाहन केलं आहे.
Lockdown2 | 3 मेपर्यंत भारत लॉकडाऊन : पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोनाची लस बनवण्याचा विडा उचला : मोदी पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांमध्येही वेगाने काम सुरु आहे. जानेवारी महिन्यात आपल्याकडे कोरोनाच्या तपासणीसाठी केवळ एकच प्रयोगशाळा होती, आता 220 पेक्षा जास्त प्रयोगशाळांमध्ये तपासणी काम सुरु आहे. भारतात आज आम्ही एक लाखांपेक्षा जास्त बेडची व्यवस्था केली आहे. एवढंच नाही तर 600 पेक्षा जास्त अशी रुग्णालयं आहेत, जी केवल कोविड-19 च्या उपचारांसाठी काम करत आहेत. या सुविधा आणखी वेगाने वाढवल्या जात आहेत. भारताकडे आज मर्यादित साधनसामुग्री आहे. परंतु माझं देशाच्या तरुण शास्त्रज्ञांना विशेष आवाहन आहे की, जगाच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या कल्याणासाठी पुढे या आणि कोरोनाची लस बनवण्याचा विडा उचला."
Coronavirus | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सप्तपदी