एक्स्प्लोर

रेल्वेच्या खाजगीकरणाला सुरुवात? देशात 109 मार्गांवर धावणार 151 खाजगी रेल्वे

रेल्वे मंत्रालयाने देशातील 109 रेल्वे मार्गांवर खाजगी रेल्वे चालवण्यास परवानगी दिली आहे. एक प्रकारे भारतीय रेल्वेच्या खाजगीकरणाला सुरुवात झाल्याचा आरोप होत आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकार देशातील प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी खाजगी कंपन्यांसोबत भागिदारी करण्याची योजना आखत आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी अर्ज मागवले आहेत. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील रेल्वेचं नेटवर्क जवळपास 12 क्लस्टरमध्ये विभागण्यात आलं आहे. यामध्ये 109 अप अँड डाऊन खाजगी रेल्वे मार्गावर 151 मॉडर्न रेल्वे चालवण्याचा विचार आहे. या योजनेंतर्गत 30 हजार कोटी रुपयांची खाजगी क्षेत्राची गुंतवणूक असेल.

काय असेल खाजगी रेल्वेची वैशिष्ट्ये? प्रत्येक खाजगी रेल्वे किमान 16 डब्यांची असेल. या रेल्वे जास्ती जास्त 160 किमी प्रति तास वेगाने धावतील. या ट्रेनचे रोलिंग स्टॉक खाजगी कंपन्या खरेदी करतील. तसंच यांच्या दुरुस्तीची आणि देखभालीची व्यवस्था खाजगी कंपन्यांची असेल. रेल्वेकडून फक्त ऑपरेटर आणि गार्ड देण्यात येणार आहे. यातील सर्वाधिक रेल्वे मेक इन इंडियाच्या अंतर्गत तयार करण्यात येणार असल्याचे समजते.

भारताकडून चीनला आणखी एक धक्का; यापुढे महामार्ग प्रकल्पात चिनी कंपन्यांना परवानगी नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

नवीन रोजगाराची निर्मिती खाजगी कंपन्यांना रेल्वे चालवण्यास परवानगी दिल्याने नव्याने मोठ्या प्रमाणात रोजगारांची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. सोबतचं प्रवाशांच्या प्रवासाच्या खर्च कमी होणार आहे. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेसोबतचं त्यांना जागतिक स्तरावरील सुविधा मिळणार असल्याचेही रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे. इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे मंत्रालयाने खाजगी कंपन्यांना रेल्वे चालवण्याची परवानगी दिली आहे.

अटी आणि शर्थी

  • रेल्वे गाडीतील वातानुकूलित डबे हे मेक इन इंडिया असले पाहिजे.
  • रेल्वे 35 वर्षांसाठी हा प्रोजेक्ट खाजगी कंपन्यांना देईल.
  • रेल्वे विभागाकडून या प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी ड्रायव्हर आणि गार्ड देण्यात येतील.
  • इतर सर्व व्यवस्था खाजगी कंपन्यांना करावी लागेल. यामध्ये रेल्वे इंजिन देखभाल, दुरुस्ती यांचा समावेश असेल.

Indian Railway | देशात 109 रेल्वे मार्गांवर खासगी रेल्वे सुरु करण्याचा सरकारचा विचार

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
Bollywood Actress :
"त्याने मला मध्यरात्री 3 वाजता बोलावलं..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; म्हणाली,"मी रात्रभर रडत होते"
Bollywood Movies Updates : 30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
Vinod Tawde : मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vinod tawde Full PC : विनोद तावडे यांची पत्रकार परिषद एबीपी माझा ABP MajhaAmravati Amit Shaha Stage Collapsed : ज्या मैदानासाठी बच्चू कडूंनी राडा घातला तिथला मंडपच कोसळला!Aditya Thackeray Full Pc: ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला भाजपने घात, आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोलAmit Shaha Rally Akola : अकोल्यात आज केंद्रीय मंत्री अमित शाहांची सभा, जोरदार पावसाची हजेरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
Bollywood Actress :
"त्याने मला मध्यरात्री 3 वाजता बोलावलं..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; म्हणाली,"मी रात्रभर रडत होते"
Bollywood Movies Updates : 30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
Vinod Tawde : मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
Bachchu Kadu : बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
Shah Rukh Khan with Suhana Khan : शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला
शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला
Bachchu Kadu Amravati : पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा
पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा
Bollywood Intimate Scenes : बॉलिवूडच्या 'या' चित्रपटांत इंटिमेट सीन्सदरम्यान बोल्डनेसच्या सर्व सीमा पार; शूटिंगदरम्यानच कलाकार झाले 'Out Of Control'
बॉलिवूडच्या 'या' चित्रपटांत इंटिमेट सीन्सदरम्यान बोल्डनेसच्या सर्व सीमा पार; शूटिंगदरम्यानच कलाकार झाले 'Out Of Control'
Embed widget