Indian Railway : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, जाणून घ्या प्रवाशांचे काय अधिकार आहेत?
Indian Railway : जर तुम्हाला रेल्वे प्रवासी म्हणून तुमचे अधिकार माहित असतील तर प्रवासादरम्यान होणारे विविध त्रास टाळू शकता, तसेच तुमची बचत देखील होऊ शकते.
Indian Railway : आपण अनेकदा रेल्वेने प्रवास करतो. प्रवासाला जाण्यापूर्वी, आपण रेल्वेचे कन्फर्म तिकीट, ट्रेनची येण्याची वेळ इत्यादी गोष्टी चांगल्या प्रकारे जाणून घेतो. यासोबतच, बहुतेक लोक सुट्ट्यांव्यतिरिक्त सामान्य दिवसात ट्रेनमध्ये प्रवास करतात, त्यामुळे जर तुम्हाला रेल्वे प्रवासी म्हणून तुमचे अधिकार माहित असतील तर विविध त्रास टाळू शकता, परंतु तुमची बचत देखील होऊ शकते. प्रवासी म्हणून तुमचे काय अधिकार आहेत ते जाणून घेऊया.
तत्काळ तिकीट रद्द केल्यावर पैसे परत मिळवा
-संबंधित स्थानकावर तुमची ट्रेन तीन तास किंवा त्याहून अधिक उशिराने येत असल्यास आणि तुम्ही त्यात प्रवास करत नसल्यास.
- जर ट्रेनचा मार्ग बदलला असेल आणि तुमचे गंतव्य स्थानक बदललेल्या रुटमध्ये येत नसेल, तर तुम्हाला अपेक्षित रक्कम मिळू शकते.
- रेल्वे रोको, रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ट्रेन रद्द झाली, तर तुम्हाला तिकिटाचा पूर्ण परतावा मिळू शकतो.
दुसऱ्या तिकिटाने करा प्रवास
तुम्ही तुमचे प्री-बुक केलेल्या तिकीटावर कुटुंबातील सदस्यांना म्हणजे पालक, पत्नी, भाऊ आणि मुले यांना पाठवू शकता. मात्र यासाठी तुम्हाला 24 तास अगोदर रेल्वेच्या मुख्य आरक्षण पर्यवेक्षकाकडे अर्ज करावा लागेल.
तुम्ही प्लॅटफॉर्म तिकिटाने कधी प्रवास करू शकता?
जर तुम्हाला अचानक कुठेतरी जाण्यासाठी ट्रेन पकडावी लागली आणि तिकीट काउंटर बंद असेल, तर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करून ट्रेनमध्ये चढू शकता. तथापि, ट्रेनमध्ये चढल्यानंतर, तिकीट आरक्षित करण्यासाठी तुम्हाला वैयक्तिकरित्या तिकीट निरीक्षकाकडे जावे लागेल, असे न केल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल.
डुप्लिकेट तिकीट
जर तुम्हाला रेल्वे रिझर्व्हेशन काउंटरवरून कन्फर्म तिकीट मिळाले असेल पण ते कुठेतरी हरवले असेल तर तुम्ही डुप्लिकेट तिकीट घेऊन प्रवास करू शकता. सामान्य शुल्क भरून डुप्लिकेट तिकिटे जवळच्या तिकीट काउंटरवरून मिळवता येतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या