चीनवर भारताचा दुसरा डिजिटल स्ट्राइक? केंद्र सरकारकडून आणखी 47 चिनी अॅप्सवर बंदी
टिकटॉकसह 59 चिनी अॅप्स भारत सरकारने आधीच बॅन केले आहेत. आता भारत सरकारने चीनवर दुसरा डिजिटल स्ट्राइक केला असून केंद्र सरकारकडून आणखी 47 चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
नवी दिल्ली : चीनवर भारत सरकारने पुन्हा एकदा कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. भारत सरकारने आणखी 47 चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे. याआधी भारताने चीनचे 59 अॅप्स बॅन केले होते. या अॅप्सवर यूजर्सचा डेटा लीक करण्याचा आरोप लावण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. परंतु, अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भारत आणि चीनी सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपीनंतर भारताने चीनवर डिजिटल स्ट्राईक करत त्यांच्या 59 अॅप्सवर बंदी घातली होती.
'पबजी'सह चीनच्या 275 अॅप्सची यादी तयार
टिकटॉकसह 59 चिनी अॅप्स भारत सरकारने आधीच बॅन केले आहेत. आता सरकारची नजर 275 चिनी अॅप्सवर आहे. ज्यामध्ये PUBG चाही समावेश आहे. आता सरकारने आणखी 47 अॅप्सवर बंदी घातल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. परंतु, गृह मंत्रालयाकडून यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित एका अधिकृत सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, चिनी अॅप्ससंदर्भात माहिती गोळा केली जात असून त्यासंदर्भात चौकशी सुरु आहे. तसेच यासर्व अॅप्सना फंडिंग कुठून मिळतं, यासंदर्भातही माहिती गोळा करण्यात येत आहे. यापैकी काही अॅप्समुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असल्याचं समोर आलं आहे, तर काही अॅप्स डाटा शेअरिंगच्या नियमांचं उल्लंघन करत असल्याचंही समोर आलं आहे.
भारत सरकारचा चीनला दणका; टिकटॉक, यूसी ब्राऊजरसह 59 अॅप्स बॅन
दरम्यान, लद्दाख येथील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेनंतर भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण आहे. या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. या घटनेनंतर चीनविरोधात भारतात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम देखील सुरु करण्यात आली होती. चीनचे 59 अॅप्स बॅन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. यामध्ये कमी वेळेत खूप लोकप्रिय झालेल्या टिकटॉक अॅपचाही समावेश होता. टिकटॉकसह यूसी ब्राऊजर, शेअर इट इत्यादी अॅप्सवर केंद्र सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचं हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयानं आयटी अॅक्ट कलम 69 अ अंतर्गत 59 चीनी अॅप्सवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
सरकारच्या बंदीनंतर गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरुन TikTok अॅप हटवलं!