'भारत पुढील चार वर्षात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार'; मॉर्गन स्टॅनलेचा रिपोर्ट
उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था अधिक चांगली आहे आणि 2023 साठी कमी चलनवाढ आणि कमी दर वाढ यावर बाजाराचा दृष्टीकोन सकारात्मक असल्याचं मॉर्गन स्टॅनलेचे इमर्जिंग मार्केट इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट जोनाथन गार्नर म्हणाले.
Indian Economy : कोरिया आणि तैवान सारख्या इतर आशियाई उदयोन्मुख बाजारपेठांच्या तुलनेत भारताची आर्थिक स्थिती सकारात्मक आहे, असं प्रतिपादन मॉर्गन स्टॅनलेचे इमर्जिंग मार्केट इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट जोनाथन गार्नर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. भारत सर्वात महागड्या बाजारपेठांपैकी एक आहे आणि भारतात FY22 मध्ये कमाईत वाढ झाली आहे, तर कोरिया आणि तैवान सारख्या अर्थव्यवस्थांना सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे फटका बसला आहे. उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था अधिक चांगली आहे आणि 2023 साठी कमी चलनवाढ आणि कमी दर वाढ यावर बाजाराचा दृष्टीकोन सकारात्मक असल्याचं गार्नर म्हणाले.
आर्थिक विकासाच्या एका नव्या युगाची अपेक्षा
विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या विश्लेषकांना आर्थिक विकासाच्या एका नव्या युगाची अपेक्षा आहे असं मॉर्नग स्टेन्लेच्या संशोधन पेपरातून त्यांनी मांडलं आहे आणि हे पाहाता भारतामध्ये जागतिक उत्पादनात भारताचा वाटा वाढवणे, पत उपलब्धता वाढवणे, नवीन व्यवसाय निर्माण करणे, जीवनाचा दर्जा सुधारणे आणि चालना देणे यासारखे आश्चर्यकारक बदल घडून येतील असंही गार्नर यांनी म्हटलं आहे.
“आम्हाला विश्वास आहे की भारत 2027 पर्यंत जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी-सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे आणि या दशकाच्या अखेरीस तिसरा सर्वात मोठा स्टॉक मार्केट असेल,” असे मॉर्गन स्टॅनलीचे भारतासाठी मुख्य इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट रिधम देसाई यांनी म्हटलंय. परिणामी, भारत जागतिक व्यवस्थेत सामर्थ्य मिळवेल आणि हे वैशिष्ट्यपूर्ण एका पिढीतील बदल आणि गुंतवणूकदार आणि कंपन्यांसाठी एक संधी सूचित करतात ठरतील असंही त्यांनी म्हटलं आहे.
मॉर्गन स्टॅनलेने यासंबंधी डेटाही दाखवला आहे, बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतातील गुंतवणुकीच्या दृष्टीकोनाबद्दलची भावना सर्वकाळ उच्च आहे. भारतातील GDP मधील उत्पादनाचा वाटा 2031 पर्यंत 15.6 टक्क्यांवरून 21 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो आणि या प्रक्रियेत भारताचा निर्यात बाजारातील हिस्सा दुप्पट होऊ शकतो असं डेटाने सूचित केलं आहे.
मॉर्गन स्टॅनले काय आहे ?
मॉर्गन स्टॅनले ही एक जागतिक वित्तीय सेवा फर्म आहे ज्याचे मुख्यालय न्यूयॉर्क शहर, न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स येथे विविध कॉर्पोरेशन, सरकार, वित्तीय संस्था आणि व्यक्तींना सेवा देत आहे. मॉर्गन स्टॅनली जगभरातील 36 देशांमध्ये 600 हून अधिक कार्यालये आणि 60,000 हून अधिक कर्मचारी असलेल्या कार्यरत आहेत.