Indian Army : भारतीय सैन्याची ताकद वाढणार! 120 कामिकाझे ड्रोन सामील होणार, जाणून घ्या काय आहे खासियत?
Indian Army : ही ड्रोन यंत्रणा चीनच्या सीमेवर तैनात करून भारतीय लष्कर आपली सीमा सुरक्षा वाढवू शकणार आहे.
Indian Army : भारतीय लष्कर (Indian Army) सेनेची ताकद वाढवण्यासाठी आणखी एक महत्वाचे पाऊल उचलणार आहे. भारतीय लष्कर आता शक्तिशाली कामिकाझे ड्रोन (Kamikaze Drones) विकत घेणार आहे. भारताने सीमा सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी 120 कामिकाझे ड्रोन आणि 10 एरियल टार्गेटींग सिस्टीम खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी 4 नोव्हेंबर 2022 रोजी ही माहिती दिली. 'बाय इंडियन' अंतर्गत फास्ट ट्रॅक प्रक्रियेद्वारे लॉटरिंग सिस्टम आणि एरियल टार्गेटिंग सिस्टीम खरेदी केल्या जात आहेत.
Indian Army has issued tender for procuring 10 sets of aerial targeting system along with 120 loitering munitions under fast track procedures as part of emergency procurement powers: Indian Army officials
— ANI (@ANI) November 3, 2022
सीमा क्षेत्रात घुसखोरी रोखण्यास होणार मदत
भारतीय लष्कराच्या माहितीनुसार, या खरेदीसाठी आरएफपी लवकरच जारी केला जाईल आणि खरेदीच्या प्रस्तावांची माहिती दिली जाईल. अशा प्रकारच्या ड्रोनची खरेदी देशाच्या सीमावर्ती भागावर लक्ष ठेवण्यास मदत करेल. तसेच घुसखोरी रोखण्यास मदत करेल. ही ड्रोन यंत्रणा चीनच्या सीमेवर तैनात करून भारतीय लष्कर आपली सीमा सुरक्षा वाढवू शकते.
चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर लक्ष
हे ड्रोन भारतीय लष्करात सामील झाल्यामुळे चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर लक्ष ठेवण्यात मदत होईल. चीनसोबतची सद्यस्थिती लक्षात घेता ही खरेदी महत्त्वाची मानली जात आहे. भारत चीनच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या कारवायांना प्रतिकार करण्यासाठी या ड्रोनचा वापर होणार आहे.
भारताची योजना काय?
भारताने यापूर्वीच चीनच्या सीमेसाठी K-9 वज्र ट्रॅक्ड सेल्फ प्रोपेल्ड हॉवित्झर, पिनाका रॉकेट सिस्टम, अल्ट्रा-लाइट M-777 हॉवित्झर इत्यादींची खरेदी पूर्ण केली आहे. विशेषत: पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादामुळे ही खरेदी महत्त्वाची मानली जात आहे. भारताने 363 ड्रोन खरेदीसाठी 16 ऑक्टोबर रोजी दोन निविदा जारी केल्या आहेत, ज्याचे उद्दिष्ट भारत होम टेक्नोलॉजी विकसित करण्याच्या उद्देशाने करत आहे. या ड्रोनच्या निर्मितीमध्ये 60 टक्के स्थानिक पातळीवरील साहित्य वापरण्याची अट आहे.
मानवरहित हवाई वाहनांसाठी निविदा
भारतीय लष्कराने मानवरहित हवाई वाहनांसाठी (UAVs) काही नवीन निविदा देखील काढल्या आहेत. ज्यात लॉजिस्टिक ड्रोन आणि मानवरहित पाळत ठेवणारे हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे.
कामिकाझे ड्रोन बद्दल जाणून घ्या
ही लहान मानवरहित विमाने आहेत, जी स्फोटकांनी भरलेली आहेत. ज्याने थेट शत्रूंच्या लष्करी तळांवर वापरली जाऊ शकतात. त्यांना स्विचब्लेड म्हणतात. कारण त्यांचे ब्लेडसारखे पंख प्रक्षेपणाच्या वेळी बाहेर निघतात. वॉरहेड्ससह त्याचे वजन सुमारे 5.5 पौंड आहे आणि ते 7 मैलांपर्यंत उडू शकते.
रक्षा अधिग्रहण परिषद (DAC)
भारतात संरक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली रक्षा अधिग्रहण परिषदेच्या अंतर्गत ही खरेदी केली जाते. DAC खरेदीवर निर्णय घेणारी ही सर्वोच्च संस्था आहे. त्याच्या सदस्यांमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) लष्कर, नौदल आणि हवाई दल प्रमुखांचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Afghanistan : तालिबान सरकारचा महिलांवर जाच, शिक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना चाबकाचे फटके