(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rafale: वायूसेनेच्या विदेशी युद्धसरावात पहिल्यांदाच राफेल तैनात, फ्रान्सला आज होणार रवाना
Indian Air Force : आईएएफची एक तुकडी मोंट-डी-मार्सन येथील युद्ध सरावात सहभागी होण्यासाठी फ्रान्सला रवाना होणार आहे.
नवी दिल्ली : भारतीय वायू सेनेची (Indian Air Force) तुकडी फ्रान्सच्या मोंट-डी-मार्सन मिलिट्री बेस (Mont-de-Marsan Military Base) येथे होणाऱ्या युद्ध सरावात तैनात करण्यात आले आहे. फ्रान्समध्ये हा युद्धसराव जवळपास तीन आठवडे चालणार आहे. या युद्ध सरावासाठी चार राफेल, दोन सी-17 विमान, दोन आयएल -78 मिज एअर रिफ्युलर तैनात करण्यात आले आहे. हवाई दलाची तुकडी शुक्रवारी (14 एप्रिल) ला या युद्ध सरावासाठी रवाना होणार आहे. भारतीय वायू दलात राफेल दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच विदेशी युद्ध सराव अभ्यासात सहभागी होणार आहे.
वायू सेनने दिलेल्या माहितीनुसार, आईएएफची एक तुकडी मोंट-डी-मार्सन येथील युद्ध सरावात सहभागी होण्यासाठी फ्रान्सला रवाना होणार आहे. हा युद्ध सरावाचे आयोजन 17 एप्रिल ते 5 मे या कालावधीत करण्यात आले आहे. यामध्ये चार राफेल, दोन सी-17 विमान, दोन आयएल -78 मिज विमानं आणि हवाई दलाचे 165 जवान सहभागी होणा आहे.
हे देश सहभागी होणार युद्ध सरावात
भारतीय वायू सेन आणि फ्रेंच एअर अॅन्ड स्पेस फोर्सबरोबर जर्मनी, ग्रीस, इटली, नेदरलँड, युनायटेड किंगडम, स्पेन आणि अमेरिकेचे हवाई दल या युद्ध सरावात सहभागी होणार आहे
राफेलचे वैशिष्ट्य
राफेल हे दोन इंजिन असलेलं लढाऊ विमान आहे, ज्याची निर्मिती दसॉल्ट नावाच्या एका फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. यात मिटिऑर आणि स्काल्प ही दोन क्षेपणास्त्र आहेत. हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे. राफेलची मारक क्षमता 3700 किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज 300 किलोमीटर आहे. हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे. राफेल विमान 24,500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं. राफेल विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास आहे.
भारताच्या गरजेनुसार विमानात बदल
राफेल लढाऊ विमानात भारताच्या गरजेनुसार अनेक बदल केले आहेत. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांसाठी यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांना फक्त ऑपरेशनल माहितीच नाही तर याच्या देखभाल आणि दुरुस्तीबाबतही माहिती देण्यात आली आहे. भारत सरकारने 2016 मध्ये फ्रान्स सरकारसोबत 36 राफेल लढाऊ विमानांचा व्यवहार केला होता. यासाठी भारताने 59 हजार कोटी रुपयांची भलीमोठी रक्कम मोजली होती. या व्यवहारावरुन देशातील राजकारण ढवळून निघालं होतं.