Sputnik V : लसीकरणाच्या मोहिमेला वेग येणार; रशियाच्या Sputnik V लसीची पहिली खेप 1 मे रोजी देशात दाखल होणार
रशियाची कोरोना लस Sputnik V कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या तुलनेत जास्त परिणामकारक मानली जाते. लसीचे किमान पाच कोटी डोस भारताला पाठवण्याचे नियोजन रशियाने केलं असल्याची माहिती आहे.
नवी दिल्ली : भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या दुसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कोरोनाची लस हे सर्वात मोठं हत्यार असल्याचं सांगण्यात येतंय. सध्या भारताच्या लसीकरणाच्या कार्यक्रमात कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसी वापरण्यात येत आहेत. त्यात आता आणखी एका लसीची भर पडणार असून रशियाची Sputnik V या लसीची पहिली खेप 1 मे पर्यंत भारतात दाखल होणार आहे.
#India will receive first batch of Russia's #SputnikV vaccine on May 1 - Reuters quotes RDIF CEO Kirill Dmitriev
— Sputnik V (@sputnikvaccine) April 27, 2021
👇https://t.co/QCyistz8iZ
रशियाच्या RDIF अर्थाच रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे अध्यक्ष किरिल दमित्रिव यांनी या बाबत माहिती दिली. रशियाच्या Sputnik V या लसीमुळे भारतातील कोरोनाच्या मोहिमेला गती मिळणार आहे. नेमके किती प्रमाणात डोस येणार याची माहिती देण्यात आली नसली तरी लसीचे किमान पाच कोटी डोस भारतामध्ये पाठवण्याचे नियोजन रशियाने केलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरुवातीला भारत या लसीचे आयात करेल आणि नंतर देशातच या लसीच्या निर्मितीला सुरूवात केली जाईल असंही सांगण्यात येतंय.
रशियाची कोरोना लस Sputnik V कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या तुलनेत जास्त परिणामकारक असल्याचा दावा केला जातोय. रशियाच्या गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूटने दावा केलाय की Sputnik V लस ही 91.6 टक्के प्रभावी आहे. कोविशिल्ड ही 80 टक्के तर कोवॅक्सिन ही 81 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात येतंय. भारतात सध्या या दोन लसींचा वापर कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये केला जातोय. या दोन लसींचे महिन्याला सात कोटी डोसचे उत्पादन करण्यात येतंय. Sputnik V लस आल्यानंतर या लसींवरची निर्भरता कमी होईल असंही सांगण्यात येतंय.
महत्वाच्या बातम्या :
- कोरोनाला हरवण्यासाठी ब्रिटन भारतासोबत...100 व्हेटिंलेटर अन् 95 ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेटरची पहिली खेप दाखल
- लस उत्पादक कंपन्यांच्या नफेखोरीला पाठबळ देणाऱ्या केंद्र सरकारचे धोरण भेदभावजनक; काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचा आरोप
- COVID-19 Pandemic: जो बायडन, पंतप्रधान मोदींमध्ये दूरध्वनीवरुन कोरोनावरील सद्यपरिस्थिबाबत चर्चा