(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Coronavirus Updates : गेल्या 24 तासात 42 हजार 618 नवीन रुग्णांची भर, 330 जणांचा मृत्यू
India Coronavirus Updates : केरळमध्ये कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या वाढत असून काल एकाच दिवसात त्या ठिकाणी 29 हजार 322 रुग्णांची भर पडली आहे तर 131 जणांचा मृत्यू झाला.
India Coronavirus Updates : गेल्या काही दिवसापासून देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात कोरोनाच्या 42 हजार 618 नवीन रुग्णांची भर पडली असून 330 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 36 हजार 385 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्या आधी शुक्रवारी 45,352 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तर 366 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
देशातील चार लाख पाच हजार 681 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. आतापर्यंत कोरोना लसीचे एकूण 67 कोटी 72 लाख 11 हजार 205 डोस देण्यात आले आहेत. केरळमध्ये कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या वाढत असून काल एकाच दिवसात त्या ठिकाणी 29 हजार 322 रुग्णांची भर पडली आहे तर 131 जणांचा मृत्यू झाला.
देशातील कोरोनाची सद्यस्थिती :
- कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 29 लाख 45 हजार 907
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 21 लाख 001
- सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : चार लाख पाच हजार 681
- एकूण मृत्यू : चार लाख 40 हजार 225
- एकूण लसीकरण : 67 कोटी 72 लाख 11 हजार 205 डोस
राज्याची स्थिती
राज्यात काल 4,313 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 360 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 86 हजार 345 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 04 टक्के आहे.
राज्यात काल 92 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 50 हजार 466 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 973 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (66), नंदूरबार (2), धुळे (25), जालना (22), परभणी (53), हिंगोली (60), नांदेड (28), अकोला (18), वाशिम (1), बुलढाणा (74), यवतमाळ (13), नागपूर (64), वर्धा (3), भंडारा (6), गोंदिया (3), गडचिरोली (37) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 44,87,950 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,77,987 (11.98 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,98,098 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,954 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 422 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 422 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 303 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,23,458 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3532 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1446 दिवसांवर गेला आहे.
संबंधित बातम्या :