Coronavirus : भारत आता कोरोनाच्या 'एन्डेमिक' स्थितीत, लोक कोरोनासोबत जगायला शिकलेत: डॉ. सौम्या स्वामिनाथन
देशात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी डॉ. सौम्या स्वामिनाथन (Soumya Swaminathan) यांच्या मते कोरोनाचा प्रसार कमी होण्याच्या मार्गावर आहे. (COVID19 in India Maybe Reaching Endemic Stage).
नवी दिल्ली : भारतातील कोरोना प्रसाराने आता एन्डेमिक स्थितीमध्ये प्रवेश केला असून त्यामुळे त्याचा प्रसार आता कमी किंवा मर्यादेच्या आत होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकार जरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवत असलं तरी डॉ. सौम्या स्वामिनाथन यांच्या मते, भारतात कोरोनाचा प्रसार कमी होण्याच्या मार्गावर आहे. तसेच भारतातील व्हायरस कमजोर झालेला असून या आजारासह जगायला भारतीय लोक शिकलेत आणि लसीकरणही होतंय असंही त्या म्हणाल्या.
डॉ. सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या की, "भारताने आता अशा स्थितीत प्रवेश केला आहे की ज्यामध्ये कोरोनाचा प्रसार हा कमी किंवा मर्यादेच्या आत होत आहे. काही महिन्यापूर्वी भारतात कोरोनाचा प्रादुर्भावाचा विस्फोट झाल्याचं पहायला मिळालं होतं. ती परिस्थिती आता राहिली नाही."
भारतातील कोरोनाचा प्रसार हा बराच काळ राहणार असल्याचंही डॉ. स्वामिनाथन यांनी स्पष्ट केलं.
Covid 22 : नवीन सुपर व्हेरिएंट 'कोविड 22' हा डेल्टापेक्षाही अधिक धोकादायक; तज्ज्ञांचा इशारा
एन्डेमिक स्थिती अशी असते की ज्यामध्ये देशातील मोठी लोकसंख्या ही त्या व्हायरस सोबत जगायला शिकते, किंवा त्यांना त्याची सवय होते. याच्या विरोधात इपिडेमिक स्थिती असते, ज्यामध्ये मोठ्या लोकसंख्येवर व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त होत असून त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतं.
येत्या सप्टेंबर महिन्याच्या मध्यावधीपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं भारतीय लस कोवॅक्सिनला मान्यता मिळेल असा विश्वासही डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी व्यक्त केला. द वायर या माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं. 2022 सालच्या अखेरपर्यंत भारतातील 70 टक्के जनतेचं लसीकरण पूर्ण होईल आणि आपण पुन्हा पूर्वीच्या सामान्य परिस्थितीमध्ये येऊ शकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोरोनाच्या सध्याच्या आकडेवारीवरुन ही गोष्ट निश्चितच स्पष्ट होते की सध्या बूस्टर डोसची गरज नाही. सर्वात आधी सर्वात सर्वात आधी आपल्याला जगातील गरीब देशांचे पूर्णपणे लसीकरण करण्याबाबत विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतरच श्रीमंत देशांच्या लसीच्या बूस्टर डोसबाबत विचार केला पाहिजे असंही डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी या आधी स्पष्ट केलं होतं.
Covid Vaccine : देशातील 1.6 कोटी लोकांना वेळेत दुसरा डोस नाही, ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक