Covid-19 : धोका वाढला! देशात 21 हजार 411 नवीन कोरोनाबाधित, 67 रुग्णांचा मृत्यू, सक्रिय रुग्णांची संख्या दीड लाखांवर
Coronavirus New Cases : देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दीड लाखांहून अधिक झाली आहे. मागील 24 तासांत 67 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : भारतात कोरोनाचा फैलाव थांबण्याचं नाव घेत नाहीय. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. देशात देशात नवीन कोरोना रुग्णांसह मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. देशात गेल्या 24 तासांत 21 हजार 411 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी दिवसभारत 67 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमा आधीच्या दिवसाच्या तुलनेनं जास्त आहे. गुरुवारी देशात 21 हजार 880 कोरोनाबाधित आढळले होते आणि 60 रुग्णांचा मृत्यू झाला.
देशात शुक्रवारी 67 रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोनाबाधितांसह कोरोनाबळींच्या संख्येतही वाढ झाली आहे. भारतात गेल्या 24 तासांत 67 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या दीड लाखांच्या पुढे गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, 20 हजार 726 कोरोनााबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोना महामारी सुरु झाल्यापासून एकूण 5 लाख 25 हजार 997 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) July 23, 2022
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/ECnE0CnEk8 pic.twitter.com/BXD5RpaeWQ
महाराष्ट्रात आढळला ओमायक्रॉन BA.5 सब-व्हेरियंट
देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रात (Maharashtra) ओमायक्रॉनचा (Omicron) सबव्हेरियंट बीए.5 (Sub Variant BA.5) ची लागण झाल्याले रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं माहिती दिली आहे की, दोन रुग्णांना ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट बीए.5 ची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. दुबईहून परतल्यानंतर पुणे विमानतळावर नियमित तपासणी दरम्यान या दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं होतं.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ
गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे. राज्यात 2515 नव्या रुग्णांची (Corona Update) भर पडली आहे तर 2449 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून एकूण सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Coronavirus : चिंता वाढली! महाराष्ट्रात आढळला ओमायक्रॉन BA.5 सब-व्हेरियंट; पुण्यात 2 रुग्णांची नोंद
- Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, आज 2,515 रुग्णांची नोंद तर सहा जणांचा मृत्यू