Coronavirus : चिंता वाढली! देशात 16 हजार 135 नवे कोरोना रुग्ण, 24 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus New Cases : देशातील कोरोनाच्या संसर्गात किंचित वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाच्या संसर्गात किंचित वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात 13 हजार 958 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सध्या भारतात 1 लाख 13 हजार 864 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा सकारात्मकता दर 4.85 इतका आहे.
देशात शनिवारी दिवसभरात 16 हजार 103 नवीन कोरोनाबाधितांची नोंद आणि 31 रुग्णांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. त्याच्या तुलनेनं रविवारी समोर आलेली रुग्णांची संख्या कमी आहे. पण देशातील कोरोना संसर्ग अद्याप कायम आहे.
महाराष्ट्र-दिल्लीने देशाचं टेन्शन वाढवलं
देशात पुन्हा एकदा कोरोना महामारीने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, दिल्लीसह मेट्रो शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारी महाराष्ट्रात जवळपास तीन हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत 761 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनचा (Omicron) सब-व्हेरियंट BA.4 चा एक रुग्णही मुंबईत आढळला आहे. देशाची राजधानी नवी दिल्लीमध्येही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाही. नवी दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येबरोबरच मृताची संख्याही वाढत आहे. नवी दिल्लीमध्ये फेब्रुवारी ते जूनदरम्यान कोरोनामुळे 157 जणांचा मृत्यू झालाय.
#COVID19 | India reports 16,135 fresh cases, 13,958 recoveries and 24 deaths, in the last 24 hours.
— ANI (@ANI) July 4, 2022
Active cases 1,13,864
Daily positivity rate 4.85% pic.twitter.com/TgcnBrAd7Z
महाराष्ट्रातही कोरोनाचा वेग वाढतोय
राज्यात रविवारी 2962 कोरोनाच्या (Corona) नव्या रुग्णांची भर पडली आहे. नवीन नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सध्या 7671 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत सहा कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,14,871 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.82 टक्के इतकं झालं आहे. राज्यात सध्या 22,485 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 7671 इतके रुग्ण असून त्यानंतर पुण्यात 5063 सक्रिय रुग्ण आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Kullu Bus Accident : 200 मीटर खोल दरीत कोसळली बस; शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु
- Kashmir Terrorist : काश्मीरमध्ये गावकऱ्यांनी दोन दहशतवाद्यांना पकडले, डीजीपींकडून दोन लाख रूपयांचे बक्षीस जाहीर
- Operation Sarhad : धक्कादायक! भारतात राहून पाक एजन्सींना पुरवायचे गुप्त माहिती, तिघांच्या मुसक्या आवळल्या