एक्स्प्लोर
Advertisement
दुःखाची गोष्ट म्हणजे आनंदी देशांच्या यादीत भारताची घसरण
नवी दिल्ली : 'वर्ल्ड हॅपीनेस डे'च्या निमित्ताने जगभरातील आनंदी देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र दुःखाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत आनंदी देशांच्या यादीत भारताची घसरण झाली आहे.
आनंदी राहणाऱ्या देशांच्या यादीत भारत चार क्रमांकांनी घसरुन 122 व्या स्थानी गेला आहे. महत्वाचं म्हणजे आनंदी देशांच्या यादीत भारत हा चीन, पाकिस्तान आणि नेपाळपेक्षाही मागे पडला आहे. चीन (79), पाकिस्तान (80), नेपाळ (99), बांगलादेश (110), इराक (117) आणि श्रीलंका (120) भारताच्या पुढे आहेत.
जगातील सर्वात आनंदी देश म्हणून नॉर्वेचा क्रमांक लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नॉर्वे तीन पायऱ्या वर गेला आहे. गेल्या वर्षी डेन्मार्क हा देश यादीत चारपैकी तीन वर्ष पहिल्या क्रमांकावर होता. 2017 मधील आनंदी देशांच्या यादीत 155 राष्ट्रांचा समावेश आहे.
2013-14 मध्ये भारताचा क्रमांक 118 वा होता. दरडोई उत्पन्न, सामाजिक आधार, आयुर्मान, निवड स्वातंत्र्य, भ्रष्टाचाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन असे काही निकष यासाठी वापरले जातात. 2012 सालापासून आनंदी देशांची यादी जाहीर होत असून यंदाचं पाचवं वर्ष आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement