India Pakistan War : ऑपरेशन सिंदूरनंतर रेल्वे हाय अलर्टवर, ब्लॅकआउट अन् आपत्कालीन स्थितीमुळे अनेक गाड्यांच्या वेगावर ब्रेक, पाहा संपूर्ण यादी
India Pakistan War : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान भारतीय रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. तसेच रेल्वेने अनेक गाड्या देखील रद्द केल्या आहेत.

India Pakistan War : ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान (India Vs Pakistan) रेल्वे (Railway) कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे बोर्डाने सर्व कर्मचाऱ्यांना अलर्ट केले आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था भारतीय लष्करी गाड्यांबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करू शकतात. यासोबतच, ब्लॅकआउट-आणीबाणीच्या परिस्थिती लक्षात घेता भारतीय रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. तर काही गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे. चला यादी पाहूया.
रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानी एजन्सीचे एजंट फोन कॉलद्वारे रेल्वे अधिकाऱ्यांकडून लष्करी गाड्यांबद्दल गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे अशा कोणत्याही कॉल किंवा संभाषणांपासून दूर राहण्याचे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या सूचना
- अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलपासून सावध राहा.
- लष्करी गाड्यांशी संबंधित कोणतीही माहिती कोणालाही देऊ नका.
- कोणत्याही संशयास्पद कॉल किंवा संपर्काची त्वरित तक्रार करा.
- निर्धारित संप्रेषण प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करा.
रेल्वे सेवेवर परिणाम
याशिवाय ब्लॅकआउट आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे काही रेल्वे सेवांवर परिणाम होईल अशी माहिती उत्तर पश्चिम रेल्वेने दिली आहे. या परिस्थितीमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु काही गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. जर तुम्ही 9 मे 2025 रोजी सहलीचे नियोजन करत असाल तर काळजीपूर्वक विचार करा. उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शशी किरण म्हणाले की, सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेच्या कामकाजात बदल करण्यात आले आहेत. ब्लॅकआउट परिस्थिती आणि आपत्कालीन व्यवस्थेमुळे रेल्वेला काही गाड्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द कराव्या लागल्या आहेत आणि काही गाड्यांचे वेळापत्रक बदलावे लागले आहे.
या ट्रेन आज धावणार नाहीत
- ट्रेन क्रमांक 14895 - भगत की कोठी ते बाडमेर रद्द
- ट्रेन क्रमांक 14896 - बारमेर ते भगत की कोठी रद्द
- ट्रेन क्रमांक 04880 - मुनाबाव ते बाडमेर रद्द
- ट्रेन क्रमांक 54881 - बाडमेर ते मुनाबाओ रद्द
या ट्रेन उशिराने धावतील
- ट्रेन क्रमांक 14807 - जोधपूर ते दादर एक्सप्रेस ९ मे रोजी जोधपूर येथून 05:10 ऐवजी 08:10 वाजता (3 तास उशिराने) निघेल.
- ट्रेन क्रमांक 14864 - जोधपूर ते वाराणसी सिटी एक्सप्रेस 9 मे रोजी जोधपूर येथून 08:25 ऐवजी 11:25 वाजता (3 तास उशिराने) निघेल.
आणखी वाचा


















