एक्स्प्लोर

Monsoon : केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं हे कसं ठरवलं जातं? भारतीय हवामान विभागाचे निकष कोणते, जाणून घ्या?

Monsoon : मान्सून आज केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. मान्सून केरळसह ईशान्य भारतात दाखल झालाय.

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांसह सर्वांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागानं(India Meteorological Department) मान्सून केरळ (Monsoon Arrived in Kerala) आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये दाखल झाल्याची घोषणा केली आहे. केरळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावली होती. भारतीय हवामान विभागानं यापूर्वी मान्सून केरळमध्ये मान्सून 31 मे रोजी दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, एक दिवस अगोदरच मान्सून केरळ आणि ईशान्य भारतात दाखल झाला आहे. 

मान्सून दाखल झाल्याचं कसं ठरवलं जातं?

भारतीय हवामान विभाग मान्सून दाखल झाला हे कोणत्या निकषांच्या आधारे ठरवलं जातं, हे अनेकदा बऱ्याच जणांना माहिती नसतं. हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी दोन वर्षांपूर्वी यासंदर्भात माहिती दिली होती. सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांनी मान्सून दाखल झाला याबाबतचे निकष सांगितले होते.

केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठीचे निकष:

1.पाऊस:14 स्टेशन्स पैकी, 60% स्टेशन्सने 2 दिवस 2.5 mm किंवा जास्त पावसांची नोंद करणे (10मे नंतर ),तर दुसऱ्या दिवशी
2.वारे फील्ड: वेस्टरलीज़ची उंची (Westerly winds) 600 hpa पर्यंत असणे, गती 15-20kts 
3.आउटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशन < 200wm-2  

ते 14 स्टेशन्स कोणते?

केरळमधील 14 स्टेशन्सवर 10 मे नंतर 60  टक्के स्टेशन्सवर 2 दिवस 2.5 mm पाऊस होणं आवश्यक असतं. या 14 स्टेशन्समध्ये मिनिकॉय, अमिनी, थिरुवनंतपुरम, पुनालूर, कोल्लम, अल्लापुझा, कोट्टयम, कोची, थ्रिसूर, कोझिकोडे, थलासरी, कन्नूर, कुडूलू, मंगलोर यांचा समावेश आहे. 

भारतीय हवामान विभागाच्यावतीनं नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सरासरीच्या 106  टक्के पाऊस झाल्यास तो सामान्य मानला जातो.   नैऋत्य  पाऊस मध्य भारत व दक्षिण भारतात सामान्यपेक्षा (>LPA च्या 106 %). जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  वायव्य भारतात सामान्य (LPAच्या 92-108%), ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी (LPAच्या <94%), मान्सून कोर झोन(MCZ)वर सामान्यपेक्षा जास्त (> LPAच्या 106%). होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. 

सर्वसाधारणपणे मान्सून केरळमध्ये 1 जूनपर्यंत दाखल होतो. आणि 15 जुलैपर्यंत संपूर्ण देशभर पोहोचतो. 

दरम्यान, गतवर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळं मान्सूनच्या आगमनावर परिणाम झाला होता. मान्सूनचा पाऊस गेल्यावर्षी उशिरानं दाखल झाला होता. गेल्या मान्सूनचा पाऊस उशिरानं दाखल झाल्यानं भारतातील शेतीला मोठा फटका देखील बसला होता.  

संबंधित बातम्या :

सावधान! देशातील अनेक शहरात उष्णतेच्या लाटेचा उद्रेक, कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांनी केल्या 'या' उपायोजना 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Doctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलंDhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजाBajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!Saif Ali Khan Attacked : सैफवरील हल्ल्यानंतरचा पहिला मोठा व्हिडीओ, पाहा EXCLUSIVE CLIP

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Nashik News : ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
Saif ali khan attack in Mumbai: लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनुभाऊ थेट जगन्मित्र कार्यालयात; वाल्मिक कराडच्या समर्थकांची गर्दी
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनंजय मुंडे परळीतील जगन्मित्र कार्यालयात पोहोचले
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
Embed widget