India COVID-19 cases : भारतात गेल्या 24 तासांत 2628 नवीन कोरोना रुग्ण, तर 18 जणांचा मृत्यू
India Covid-19 Cases : गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाची 2628 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर, 2167 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत.
India Covid-19 Cases : देशभरात कोरोनाची नवीन आकडेवारी जाहीर झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात एकूण 2628 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी, कोरोना संसर्गामुळे एका दिवसात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीनंतर देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा एकदा 15 हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज कोरोनाचे जास्त प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाचा बरा होण्याचा दर 98.75 टक्के आहे. दुसरीकडे, जर आपण सकारात्मकता दराबद्दल बोललो, तर देशात दररोज सकारात्मकता दर 0.58% आहे. गेल्या 24 तासांत एकूण 2167 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. देशात 84 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या झाल्या आहेत. गेल्या 24 तासांत 4 लाख 52 हजारांहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या.
बुधवारी मुंबईत 295 नव्या रुग्णांची भर
भारतातील कोरोना व्हायरसची स्थिती सध्या स्थिर असल्याचे दिसते. बुधवारी मुंबईत 295 नव्या रुग्णांची भर पडली आहे. बुधवारी बारा रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. बुधवारी 194 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात बुधवारी 470 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 334 रुग्ण कोरोनामुक्त
आज राज्यामध्ये 470 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 334 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात काल (बुधवारी) एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,33, 786 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Gyanvapi Case : ज्ञानवापी वाद प्रकरणी खटला चालवण्यास योग्य की नाही? वाराणसी जिल्हा न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी
- Rajya Sabha Election 2022 : संजय राऊत आणि संजय पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
- Modi Govt 8 Years : सर्जिकल स्ट्राइक, आर्टिकल 370 पासून ते कृषी कायद्यापर्यंत! मोदी सरकारचे 8 वर्षात 8 मोठे निर्णय