Coronavirus Update : देशात कोरोनाबाधितांमध्ये घट; आठवड्यात दुसऱ्यांदा 15 हजारांहून कमी रुग्णांची नोंद
India Coronavirus News Updates : गेल्या 24 तासांत 14,146 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 144 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. तर 19788 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
![Coronavirus Update : देशात कोरोनाबाधितांमध्ये घट; आठवड्यात दुसऱ्यांदा 15 हजारांहून कमी रुग्णांची नोंद india coronavirus update 17 october 2021 today new covid active recovery cases second wave Coronavirus Update : देशात कोरोनाबाधितांमध्ये घट; आठवड्यात दुसऱ्यांदा 15 हजारांहून कमी रुग्णांची नोंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/12/25ebb9bdca7a7d92249b6e3d6b3fb43f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India Coronavirus Updates : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid-19) आता मंदावतोय. आठवडाभरात दुसऱ्यांदा 15 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. रविवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 14,146 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 144 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. तर 19788 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती
कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 40 लाख 67 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 52 हजार 124 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 34 लाख 19 हजार रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाखांहून कमी झाली आहे. एकूण 1 लाख 95 हजार 846 रुग्णांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.
देशातील कोरोनाची सद्यस्थिती :
कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी : तीन कोटी 40 लाख 67 हजार 719
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 34 लाख 19 हजार 749
एकूण सक्रिय रुग्ण : एक लाख 95 हजार 846
एकूण मृत्यू : चार लाख 52 हजार 124
लसीकरणाची आकडेवारी : 97 कोटी 65 लाख 89 हजार डोस
राज्यात आज कोरोना रुग्णांची संख्या घटली, आज 1553 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1553 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 682 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 16 हजार 998 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के आहे.
राज्यात आज 26 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 089 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (12), नंदूरबार (1), धुळे (7), जालना (69), परभणी (47), हिंगोली (19), नांदेड (14), अकोला (25), अमरावती (10), वाशिम (05), अकोला (25), बुलढाणा (15), नागपूर (69), यवतमाळ (09), वर्धा (4), भंडारा (2), गोंदिया (3), गडचिरोली (1५ ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्यात सध्या 29 हजार 627 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,34,807व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,027 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 09 ,09, 998 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 333 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 333 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 526 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,26,566 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 5183 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1141दिवसांवर गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)