Omicron : देशात ओमिक्रॉनचे 25 रुग्ण, कोरोना रुग्णांपैकी 52 टक्के रुग्ण एकट्या केरळमध्ये; केंद्र सरकारची माहिती
देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येपैकी 52.8 टक्के रुग्ण हे एकट्या केरळमध्ये सापडल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. तसेच एकूण 53 टक्के प्रौढांचे संपूर्ण लसीकरण करण्यात आलं असल्याचंही सांगितलं आहे.
नवी दिल्ली: देशात गुरुवारपर्यंत ओमायक्रॉनचे एकूण 25 रुग्ण सापडले आहेत. तसेच सलग चौदाव्या दिवशी देशातील कोरोनाची रुग्णसंख्या ही दहा हजारांच्या आत असल्याची माहिती केंद्रीय सचिव राजेश भुषण यांनी दिली आहे. देशातील एकूण 53 टक्के प्रौढांचे संपूर्ण लसीकरण करण्यात आलं असल्याची माहितीही त्यांनी दिली.
केंद्रीय आरोग्य मंत्री राजेश भूषण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन देशातील कोरोना संबंधीच्या परिस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले की, "सलग चौदाव्या दिवशी देशातील कोरोनाची आकडेवारी दहा हजारांच्या आत आहे. गेल्या आठवड्यात देशात जेवढे कोरोना रुग्ण सापडले त्यापैकी 52.8 टक्के रुग्ण हे एकट्या केरळमध्ये सापडले आहेत. तसेच देशातील सध्याच्या एकूण सक्रिय रुग्णसंख्येपैकी 43 टक्के रुग्ण हे केरळमध्ये आहेत."
देशातील कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर हा दोन टक्क्यांच्या आत आहे. पण काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत असंही त्यांनी सांगितलं.
देशातील 53 टक्के प्रौढांचे पूर्ण लसीकरण
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, देशातील 53 टक्के प्रौढ लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाचे 131 डोस देण्यात आले आहेत.
देशामध्ये ओमायक्रॉनचे 25 रुग्ण
देशात गुरुवारपर्यंत एकूण 25 रुग्ण सापडले आहेत. हे रुग्ण पाच राज्यामध्ये सापडले आहेत. जगभरात 59 देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये ब्रिटन, डेन्मार्क आणि दक्षिण आफ्रिका या तीन देशांमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.
संबंधित बातम्या :
- Omicron: गुजरातमध्ये ओमायक्रॉनचे दोन नवे रुग्ण, राज्यातील संख्या तीन
- Dharavi Omicron case : धारावीत ओमायक्रॉनचा शिरकाव, आफ्रिकेतून धारावीत आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह
- पुन्हा निर्बंध, बुस्टर डोस आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha