एक्स्प्लोर

पुन्हा निर्बंध, बुस्टर डोस आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यात (Pune Updates) ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागणार का? सोबतच कोविड लशींचा बुस्टर डोस आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत महत्वाचं भाष्य केलं. 

Pune Omicron Update : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यात (Pune Updates) बोलताना वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागणार का? सोबतच कोविड लशींचा बुस्टर डोस आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत महत्वाचं भाष्य केलं. 

...तर पुढील आठवड्यात आम्ही कडक निर्णय घेणार  

अजित पवारांनी सांगितलं की, दुसऱ्या डोसचे प्रमाण पहिल्या डोसच्या तुलनेत कमी आहे. ओमायक्रॉनमुळे लोक दुसऱ्या डोसलाही प्रतिसाद द्यायला लागलेत. पण जुन्नर,  दौंड,  पुरंदर आणि बारामती या चार तालुक्यात डोसचे प्रमाण कमी आहे.  ते वाढवण्यास प्रशासनास सांगितलं आहे.  येत्या आठवड्यात आम्ही या चार तालुक्यात दुसर्‍या डोससाठी प्रयत्न करणार आहोत. परंतु पुढच्या आठवड्यात या चार तालुक्यातील नागरिकांनी याला प्रतिसाद नाही दिला तर पुढील आठवड्यात आम्ही कडक निर्णय घेणार आहोत, असं अजित पवार म्हणाले.

Pune Omicron Update : दिलासादायक...! पुण्यातील एक तर पिंपरी-चिंचवडमधील सहा ओमायक्रॉन रुग्ण बरे, अजित पवारांची माहिती

निर्बंधांमध्ये तूर्तास कोणताही बदल नाही

अजित पवारांनी म्हटलं आहे की, कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये तूर्तास कोणताही बदल नाही. परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असं ते म्हणाले. बुस्टर डोसबाबत विचार सुरु आहे. पण त्यासाठी देशपातळीवर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात यावा, असं अजित पवार म्हणाले.  सरम इन्स्टिट्यूटकडे बुस्टर डोस उपलब्ध आहे, असं ते म्हणाले.

आरोग्य विभागाची परीक्षा पुन्हा घेण्याबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

आरोग्य भरतीबाबत बोलताना ते म्हणाले की, आरोग्य विभागासारखी एवढी मोठी परीक्षा एमपीएससीकडून घेणे अशक्य आहे. आरोग्य भरतीत गैरप्रकार झाला आहे.  यामध्ये जे दोषी असतील त्यांना अशी शिक्षा करु की, पुन्हा कोणाची पेपर फोडण्याची हिंमत होणार नाही, असं ते म्हणाले. आरोग्य विभागाची गट क आणि गट ड ची परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी होतेय.  त्याबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे, असं ते म्हणाले.

पुण्यातील एकमेव ओमायक्रॉनचा रुग्ण बरा तर पिंपरी-चिंचवडमधील सहापैकी चार रुग्ण बरे

पुण्यातील ओमायक्रॉनचा एकमेव रुग्ण बरा झाला आहे.  तर पिंपरी-चिंचवड मधील सहा पैकी चार ओमायक्रॉनचे रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तर पुणे जिल्ह्यात पहिल्या डोसचे लक्ष पूर्ण झालं आहे, असंही अजित पवारांनी सांगितलं आहे. पिंपरी चिंचवडमधील सहापैकी चार ओमायक्रोन रुग्ण निगेटिव्ह झाले आहेत. यात 44 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, सात आणि दीड वर्षीय मुलींचा समावेश आहे. तर 12 आणि 18 वर्षीय मुलींचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL : 6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
Embed widget