एक्स्प्लोर

Covid19 : कोरोनाचा वेग वाढला! देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजार पार, सुमारे दोन हजार नवे रुग्ण

Covid-19 Update : देशात सुमारे दोन हजार नवे रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या पुढे गेला आहे.

Coronavirus Cases in India : देशात कोरोना व्हायरस दिवसेंदिवस झपाट्याने पसरत आहे. देशात सुमारे दोन हजार नवे रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या पुढे गेला आहे. देशात आज 1805 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दररोज सुमारे 1500 नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे. सातत्याने वाढत्या कोरोनाबाधितांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. देशात सध्या 10 हजार 300 सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 

सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजार पार

देशात गेल्या 24 तासांत 932 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच मागील 24 तासांत 1805 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा दर 0.02 टक्के आहे. देशात आतापर्यंत 4,41,64,815 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. कोविड विषाणू संसर्ग अजूनही सुरुच आहे. कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटचा प्रसार इतर विषाणूंच्या तुलनेत खूप जास्त आहे. यामुळे सरकारने सावधगिरी खबरदारी बाळगण्यास सांगितलं आहे. 

नवीन कोरोना मार्गदर्शक सूचना

दरम्यान, अलिकडे कोरोना विषाणू आणि व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझा या दुहेरी आजाराला लोक बळी पडत आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार मास्क वापरा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला देण्यात आला आहे. H3N2 फ्लूच्या पार्श्वभूमीवर पाच दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितलं आहे.

H3N2 आणि कोरोना हे दोन्ही श्वसनाचे आजार आहेत.  ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण यांसह दोन्ही व्हायरसची लक्षणे सारखी आहेत. जर एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी दोन्ही विषाणूंचा संसर्ग झाला असेल, तर त्याचा परिणाम अधिक गंभीर होऊ शकतो. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीत योग्य उपचार घ्या आणि खबरदारी बाळगा.

कोरोना संसर्ग झाल्यास 'ही' औषधं घेऊ नका

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना उपचार पद्धतीबाबत नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. बॅक्टेरिअल इन्फेक्शन नसेल तर अँटीबायोटीक औषधं देणं टाळण्यास सांगितलं आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार, कोरोनाच्या  रूग्णांच्या उपचारांसाठी 'लोपीनाविर-रिटोनावीर', 'हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन', 'आयव्हरमेक्टिन', 'मोलनुपिराविर', 'फॅविपिरावीर', 'अझिथ्रोमायसिन' आणि 'डॉक्सीसायक्लिन' यासारखी औषधे वापरली जाऊ नयेत, असं सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Corona Symptoms : लाँग कोविड रुग्णांमध्ये नवीन लक्षण, माणसांचे चेहरे ओळखण्यात अडचण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 February 2025Rinku Rajguru Kolhapur | कोल्हापुरात आर्ची आली, फोटोमुळं चर्चा झाली! Special ReportTanaji Sawant Son Kidnapping| कहाणी नेत्याच्या लेकाच्या अधुऱ्या बँकॉक वारीची ABP MajhaBharat Gogawle on Palakmantripad : पालकमंत्रिपदावरून तिन्ही पक्षात धुसफूस सुरूच Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
Embed widget