Baglihar Dam : भारताने करुन दाखवलं! चिनाब नदीचे पाणी अडवल्यानंतर पात्र कोरडं, पाकिस्तान पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तडफडणार
Pahalgam Terror Attack : ज्या चिनाब नदीचे पात्र पाहिल्यानंतर डोळे विस्फारत होते तेच पात्र सध्या कोरडं पडलं आहे. आतापर्यंत पहिल्यांदाच या नदीचे पात्र कोरडं पडल्याचं सांगितलं जात आहे.

नवी दिल्ली : सिंधू पाणी वाटप करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानचं नाक दाबण्यासाठी भारतानं आता आणखी एक पाऊल उचललं आहे. जम्मू काश्मीरमधल्या चिनाब नदीवरच्या बागलिहार धरणाचे (Baglihar Dam) दरवाजे बंद करून भारतानं पाकिस्तानला जाणारं पाणी अडवलं. त्यासाठी बागलिहार धरणातील गाळ उपसायचं कारण भारताने दिलं. त्यामुळे पाकिस्तानकडे जाणाऱ्या चिनाब नदीची (Chenab River) पाणीपातळी कमालीची खाली गेली. मात्र यामुळे पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला आहे.
शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाबचा मोठा भाग चिनाबवर अवलंबून आहे. त्यामुळे भारताच्या या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तान मेटाकुटीला येण्याची शक्यता आहे. झेलम नदीवरच्या किशनगंगा धरणाचे दरवाजेसुद्धा बंद करण्याचा विचारही सरकार करत आहे.
Chenab River Runs Dry : चिनाब नदीचे पात्र कोरडं
पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने जे म्हटलं होतं ते करुन दाखवलं आहे. सिंधू पाणी वाटप करार रद्द करुन पाकिस्तानचे पाणी अडवलं. चिनाब नदीवरील बागलीहार धरणाचे दरवाजे बंद करुन भारताने पाकिस्तानला जाणारे पाणी अडवलं. चिनाब नदीचे पात्र हे भयंकर मोठं असतानाही चिनाब नदी आता कोरडी पडल्याचं दिसून आलं.
ज्या नदीचे पात्र पाहून डोळे विस्फारले जात होते त्याच नदीमध्ये आता काहीच पाणी शिल्लक राहिलं नाही. पाणी पातळी खालावल्यानंतर नदी पात्रात लोक उतरले आणि त्यांनी नदी चालत पार केली. आपल्या आयुष्यात हे पहिल्यांदाच घडत असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं.
भारताने चिनाब नदीचे पाणी अडवल्यानंतर मात्र पाकिस्ताच्या चिंतेत वाढ झाली आहे. याचा फटका पाकिस्तानच्या पंजाब प्रांताला बसणार असून त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत.
पाणी अडवल्याने पाकिस्तानचे नुकसान काय?
- पाकिस्तानातील 80 टक्के शेती सिंधू नदी प्रणालीच्या पाण्यावर अवलंबून.
- सिंधू नदी प्रणालीच्या 93 टक्के पाण्याचा सिंचन आणि विजेसाठी वापर.
- पाकिस्तानातल्या शेती आणि पर्यावरणावर वाईट परिणाम.
-पाकिस्तानातील वीजनिर्मिती आणि उद्योगधंदे डबघाईला येणार.
पाकिस्तानची पोकळ धमकी
भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे बिथरलेल्या पाकिस्तानी नेत्यांकडून भारताला धमकी देण्याचं सत्र सुरूच आहे. आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे विशेष सल्लागार सनाउल्लाह राणा यांनी अणुहल्ल्याची धमकी दिली. याआधी पाकिस्तानच्या उपपंतप्रधांनीसुद्धा अशी धमकी दिली होती. तर आपल्याकडे अणुबॉम्ब असल्याची दर्पोक्ती माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मुलगी मरियम शरीफ यांनीही केली होती.
ही बातमी वाचा:























