एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

India Bharat Row : फाळणीच्यावेळी पाकिस्तानच्या जिन्नांनी 'इंडिया' नावाला केला होता विरोध; म्हणाले, आता हिंदुस्थान...

India Bharat : भारत आणि इंडिया या दोन नावांवर चर्चा सुरू आहे. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांनीदेखील स्वतंत्र झालेल्या भारताचे नाव इंडिया ठेवण्यास विरोध केला होता.

मुंबई भारतीय राज्यघटनेत इंडिया (India)  आणि भारत (BHARAT) ही दोन्ही नावे असताना सध्या भारत (Bharat) की इंडिया (India) या नावावरून चर्चा रंगली आहे. या निमित्ताने इंडिया आणि भारत या दोन्ही नावांचे संदर्भ दिले जात आहे. सिंधू संस्कृतीच्या उगमापासून ते आर्यांचे आक्रमण, ब्रिटीशांनी भारतीय उपखंडावर मिळवलेल्या ताब्यापर्यंतचे अनेक संदर्भ दिले जात आहेत. मात्र, इंडिया या नावाला विरोध करणाऱ्यांमध्ये आणखी एका व्यक्तीचे नाव समोर आले आहे. पाकिस्तानचे संस्थापक समजले जाणारे मोहम्मद अली जिन्ना यांनी देखील विरोध केला होता. या दाव्याच्या पुष्टीसाठी काही संदर्भ दिले जात आहेत. 

इंग्रजांनी ऑगस्ट 1947 मध्ये भारत स्वतंत्र केला. त्यासोबतच भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती झाली. मात्र, सुरुवातीचे काही वर्षे लुईस माउंटबॅटन हे भारताचे गर्व्हनर जनरल म्हणून कार्यरत होते. हे पद राष्ट्रपतींच्या समकक्ष होते. स्वातंत्र्यांच्या एका महिन्यानंतर माउंटबॅटन यांनी सप्टेंबर 1947 मध्ये माउंटबॅटन यांनी मोहम्मद अली जिना यांना एका कला प्रदर्शनाचे मानद अध्यक्ष म्हणून आमंत्रित केले. माउंटबॅटन भारतात असताना जिन्ना पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल होते. हे आमंत्रण म्हणजे एक औपचारिकता होती. मात्र, जिन्ना यांनी त्या आमंत्रणाला विरोध केला. त्यावर हिंदुस्थान ऐवजी भारत असे लिहिले होते. 

त्यावर मोहम्मद अली जिन्ना यांनी माउंटबॅटन यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, 'ही खेदाची बाब आहे की काही अनाकलनीय कारणास्तव हिंदुस्थानने 'इंडिया' हा शब्द स्वीकारला आहे. जो निश्चितच दिशाभूल करणारा आणि गोंधळ निर्माण करण्याचा हेतू आहे.' त्यावर 'एक्सिबिशन ऑफ पाकिस्तान अँड हिंदुस्थान आर्ट' लिहावे, अशी जिन्ना यांची इच्छा होती. मात्र, माउंटबॅटन यांना जिन्ना यांचे म्हणणे पटले नाही. त्यांनी आमंत्रण पत्रिकेवर कोणताही बदल केला नाही. अखेर नाईलाजाने जिन्ना यांना आमंत्रण स्वीकारावे लागले. 

याआधीदेखील जिन्ना यांनी इंडिया नावाला विरोध केला होता. भारताच्या फाळणीबाबत चर्चा सुरू असताना जिन्ना यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तान या नव्या देशांच्या नावाचा उल्लेख केला. इंडियाऐवजी हिंदुस्तान हा शब्द वापरण्याचा आग्रह होता असे म्हटले जाते. त्यावेळी पंडित नेहरू, सरदार पटेल यांनी विरोध केला. मुस्लिम लीगने धर्माच्या आधारावर पाकिस्तान मागून घेतला. मात्र, इंडिया अर्थात भारत हा धर्माच्या आधारे असलेला देश नसल्याचे म्हटले गेले. त्यावेळी जिन्ना यांना माघार घ्यावी लागली. इंडिया या नावामुळे भारतीय उपखंडातील भारताचा अग्रक्रम सूचित होत होता आणि पाकिस्तानला हे मान्य नव्हते. 

The Sole Spokesman: Jinnah, the Muslim League and the Demand for Pakistan (Cambridge University Press, 1985) या पुस्तकात पाकिस्तानी-अमेरिकन इतिहासकार आयेशा जलाल यांनी नमूद केले की, भारताने हिंदुस्थान हा शब्द न वापरता युनियन ऑफ इंडिया हे नाव घेतल्याने मुस्लिम लीगचा संताप होत होता. हिंदुस्थान अर्थात हिंदूंची भूमी असे सूचित करणारे देशाचे नाव न घेता इंडिया हे नाव घेतल्याने जिन्ना यांची चिडचिड होत होती. हे जिन्ना यांनी माउंटबॅटन यांना लिहिलेल्या पत्रातून दिसत असल्याचे लेखिकेने म्हटले. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Embed widget