Income Tax raids : चीनची मोबाईल कंपनी ओप्पोच्या डझनभर कार्यालयांवर आयकरचे छापे
ओप्पो मोबाईल (Oppo Mobile) कंपनीनं करोडो रुपयांची करबुडवेगिरी केल्याचा आयकर विभाागाचा (Income Tax) आरोप आहे.

नवी दिल्ली : चिनी मोबाईल कंपनी ओप्पोच्या डझनभर कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. वार्षिक अहवालात खर्च अधिक दाखवून करोडो रुपयांची करबुडवेगिरी केल्याचा कंपनीवर आरोप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई, दिल्लीतील गुडगाव, रेवाडीमध्ये छापे टाकले आहे. या अगोदर उत्तरप्रदेशातील ओप्पोच्या काही कार्यालयांमध्ये आयकर विभागाने छापे टाकले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, आयकर विभागाने ओप्पोच्या अनेक मॅन्युफॅक्च्युरिंग यूनिट, कॉर्पोरेट ऑफिस आणि चिनी कंपन्यांच्या गोदामांवर छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्या हाती अनेक महत्त्वाटचे दस्ताऐवज लागल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या अगोदर ऑगस्ट महिन्यात चिनी कंपनी जेडटीएफ कंपनीवर आयकर विभागाने छापे टाकले होते. ही छापेमारी गुरूग्राममध्ये झाली होते. त्यावेळी आयकर विभागाने भारतातील प्रमुखांची चौकशी केली होती. भारतात स्मार्टफोनची बाजारपेठ मोठी आहे. भारतात स्मार्टफोनच्या उलाढाल जवळपास 2.5 लाख कोटीच्या आसपास आहे. यामध्ये 70 टक्के हिस्सा हा चिनी कंपन्याचा आहे. केंद्र सरकारने संसदेत सांगितले की, देशात सध्या 92 चिनी कंपन्या रजिस्टर्ड आहे. ज्यापैकी 80 कंपन्या सक्रिय आहेत. बाजारात 10 ते 15 टक्क्यांपेक्षा जास्त भागीदारी असणारे ओप्पो आणि विवो मजबूत ऑफलाईन खेळाडू मानले जातात. रिपोर्टच्या माहितीनुसार, चिनी कंपन्यांनी भारतात वितरणासाठी एक व्यवस्था केली आहे. ज्यामुळे भारतीय ग्राहक जास्तीत जास्त आकर्षित होतात.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या इतर बातम्या :























