एक्स्प्लोर
‘आइनस्टाईनच्या सिद्धांतापेक्षा अनेक उत्तम सिद्धांत वेदांमध्ये’
आइनस्टाईन यांचा ‘e=mc2’ या सापेक्षवादाच्या सिद्धांतापेक्षा, अनेक उत्तम सिद्धांत वेदांमध्ये आहेत, असं खुद्द स्टीफन हॉकिंग म्हणाले असल्याचा अजब दावा केंद्रीय विज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी केला आहे. मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये 105 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये संबोधित करताना हर्षवर्धन यांनी हा दावा केला.
इम्फाळ/ मणिपूर : आइनस्टाईन यांचा ‘e=mc2’ या सापेक्षवादाच्या सिद्धांतापेक्षा, अनेक उत्तम सिद्धांत वेदांमध्ये आहेत, असं खुद्द स्टीफन हॉकिंग म्हणाले असल्याचा अजब दावा केंद्रीय विज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी केला आहे. मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये 105 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये संबोधित करताना हर्षवर्धन यांनी हा दावा केला.
विशेष म्हणजे, हर्षवर्धन यांच्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला आणि मुख्यमंत्री एन. वीरेन सिंहदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या या दाव्यानंतर सोशल मीडियातून टीकेबरोबरच उपहासाचा सूर उमटतो आहे.
हषवर्धन म्हणाले की, “जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचं नुकतच निधन झालं. त्यांनी स्वत: ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं की, आइनस्टाईनच्या e=mc2 च्या सिद्धांतापेक्षा वेदांमध्ये चांगले सिद्धांत चांगले आहेत.”
या दाव्याची पुष्टी करण्यासाठी यासंदर्भातील स्त्रोतांचा खुलासा करताना हर्षवर्धन म्हणाले की, “तुम्ही यासंदर्भातील स्त्रोतांची पडताळणी करा. त्यांनी ऑन रेकॉर्ड हे वक्तव्य केलं आहे. याची सत्यता पडताळण्यासाठी सर्वांनी थोडं काम केलं पाहिजे.”
दरम्यान, ट्विटरवरुनही हर्षवर्धन यांनी आपला दाव्याचं समर्थन केलं आहे. “ISC 2018 हिंदुत्वातील प्रत्येक परंपरा या वैज्ञानिक आणि वस्तूनिष्ठ आहेत. प्रत्येक अधुनिक भारतीय उपलब्धी ही आपल्या प्राचीन वैज्ञानिक उपलब्धींना पुढे घेऊन जातात. इतकेच काय, पण स्टीफन हॉकिंग यांनीही आपल्या वेदांमध्ये आइनस्टाईनच्या e=mc2 च्या सिद्धांतापेक्षा उत्तम सिद्धांत असल्याचे म्हटलं होतं.”
दरम्यान, हर्षवर्धन यांच्या दाव्याची सत्यता पडताळताना स्टीफन हॉकिंग आणि वेद असे गुगलवर सर्च केले असता, अनेक लिंक समोर येतात. यातील www.servveda.org या वेबसाईटवरुन अशाच प्रकारचा दावा करण्यात आला आहे. हे सायन्टेफिक अँड इंडस्ट्रीज रिसर्च ऑर्गनायझेशन द्वारे होस्ट करण्यात येणारी वेबसाईट आहे. ही वेबसाईट वेदांच्या संबंधित काम करते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement