एक्स्प्लोर

शिवरायांचा अपमान झाला असता तर ऐकून घेतलं असतं का? तिथेच राजीनामा दिला असता : उदयनराजे

राज्यसभा खासदारकी शपथ घेतल्यानंतर उदयराजे यांनी 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली. मात्र यानंतर सभापतींनी उदयराजेंना समज दिली. यावरुन राजकारण सुरु झालं. त्यावर उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं.

नवी दिल्ली : "छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तिथेच राजीनामा दिला असता. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नाही," अशी प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार आणि भाजप नेते उदयनराजे यांनी दिली. राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर 'जय भवानी जय शिवाजी' घोषणेवरुन सुरु असलेल्या राजकारणावर दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी ही प्रतिक्रिया दिली. कुठल्याही  प्रकारे महाराजांचा अपमान झाला ही. याच्याएवढी हास्यास्पद गोष्ट असू शकत नाही, असंही उदयनराजे म्हणाले.

"माझा स्वभाव पाहता मी ऐकून घेईन असं वाटतं का?  या सभागृहाचा चेअरमन मी आहे, असं फक्त नायडू म्हणाले. आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला. राज्यघटनुसार अशा घोषणा देता येणार असं त्यांनी सांगितलं. यानंतर व्यंकय्या नायडूंनी घोषणा राज्यघटनेला धरुन नसल्याचं सांगितलं. आदरणीय शरद पवारसाहेब तिथेच बसले होते, आपण त्यांना विचारा. जे घडलं नाही, ते भासवण्याचा प्रयत्न करू नका, ही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे," असे उदयनराजे म्हणाले.

सभापतींची उदयराजेंना समज राज्यसभा खासदारांनी काल (22 जुलै) शपथ घेतली. यावेळी भाजप नेते उदयनराजे यांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी 'जय हिंद,जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली. मात्र यानंतर सभापतींनी उदयराजेंना समज दिली. "तुम्ही सदनात नवीन आहात, त्यामुळे सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या' असं व्यंकय्या नायडू म्हणाले.

भाजपचं तोंडबंद आंदोलन : संजय राऊतांचं ट्वीट

जय भवानी जय शिवाजी या घोषणेवरुन झालेल्या वादावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. भाजपचं तोंडबंद आंदोलन सुरु झाल्याचं संजय राऊत म्हणाले होते. ""छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली सातारा बंदची अद्याप घोषणा नाही...जय भवानी! जय शिवाजी!," असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं.

भाजप औरंगजेबासारखं राज्य चालवतेय : सचिन सावंत तर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही याचा निषेध केला होता. त्यांनी शिवरायांच्या आशीर्वादाचं नाव घेत सत्तेत आलेली भाजप औरंगजेबासारखे राज्य चालवत आहे, अशी टीका त्यांनी केली होती. " छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवरायांच्या वंशजांनी केलेल्या घोषणाही चालत नाही. छत्रपतींच्या वंशजांना पुन्हा‌ अतिशय मागच्या रांगेत ठेवून इतिहास पुनर्जीवित केला जातो. शिवरायांच्या आशीर्वादाचे नाव घेत सत्तेवर आलेली भाजपा औरंगजेबासारखे राज्य चालवत आहे. जाहीर निषेध!, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं होतं. 'जय श्रीराम'च्या पत्रांना 'जय भवानी जय शिवाजी' घोषणेच्या पत्रांनी उत्तर भारतीय जनता युवा मोर्चा अभियान राबवून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जय श्रीराम लिहिलेली दहा लाख पत्र पाठवणार आहे. आता भाजपुमोच्या या अभियानाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसही उत्तर देणार आहे. "जय भवानी जय शिवाजी" लिहून 20 लाख पोस्टकार्ड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठवणार आहे. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी' घोषणा दिली होती. यानंतर व्यंकय्या नायडू यांनी समज दिली. याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपराष्ट्रपतींना 20 लाख पत्र पाठवणार आहे. संबंधित बातम्या भाजयुमोला राष्ट्रवादी युवकचं उत्तर, 'जय भवानी जय शिवाजी' लिहिलेली 20 लाख पत्र उपराष्ट्रपतींना पाठवणार 'जय श्रीराम' लिहिलेली 10 लाख पत्र शरद पवारांना पाठवणार, भाजपा युवा मोर्चाकडून राज्यभर अभियान राज्यसभा खासदारांचा शपथविधी; प्रियांका चतुर्वेदींची मराठीत, तर उदयनराजेंची इंग्लिशमध्ये शपथ Udayanraje Bhosale PC | शिवरायांचा अपमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता : उदयनराजे

महत्त्वाच्या बातम्या

तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget