एक्स्प्लोर

मी सर्व रस्ते प्रियांका गांधींच्या गालासारखे करेन; भाजप नेत्याची जीभ घसरली, हे आरएसएसचे संस्कार, काँग्रेसची टीका

या वक्तव्याचा व्हिडिओ काँग्रेस नेते पवन खेडा यांनी X वर (ट्विटर)  शेअर केला आहे. रमेश बिधुरी व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत

नवी दिल्ली :  दिल्लीतील भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी एका प्रचारसभेत प्रियांका गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. या वक्तव्याचा व्हिडिओ काँग्रेस नेते पवन खेडा यांनी X वर (ट्विटर)  शेअर केला आहे. रमेश बिधुरी व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत, 'लालूंनी वचन दिले होते की ते बिहारचे रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे बनवतील, पण ते तसे करू शकले नाहीत. मी तुम्हाला आश्वासन देतो, ज्याप्रमाणे मी ओखला आणि संगम विहारचे रस्ते बनवले, त्याचप्रमाणे मी कालकाजीतील सर्व रस्ते प्रियंका गांधींच्या गालासारखे करेन. या वक्तव्यावर पवन खेडा यांनी आक्षेप घेतला. त्यांनी लिहिले ही बदमाशी या नीच प्रवृत्तीच्या माणसाची फक्त मानसिकता दाखवत नाही, तर यांच्या मालकांचा खरा चेहरा दाखवते. भाजपच्या या नीच नेत्यांमध्ये तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्कार दिसतील.

काँग्रेसने लालूंना हेमा मालिनी यांची माफी मागायला सांगावी

काँग्रेसच्या विरोधावर रमेश बिधुरी म्हणाले, 'मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. काँग्रेसच्या विधानावर आक्षेप असेल तर आधी लालू यादव यांना हेमा मालिनी यांची माफी मागायला सांगा, कारण त्यांनीही तसं वक्तव्य केलं होतं. रमेश बिधुरी कालकाजीमधून आतिशी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादीत 29 नावे आहेत. यातील 7 नेत्यांनी नुकतेच आप आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रवेश वर्मा नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. कालकाजीमधून सीएम आतिशी यांच्या विरोधात रमेश बिधुरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवर काँग्रेसने अलका लांबा यांना तिकीट दिले आहे.

पहिल्या यादीत गेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळालेल्या बहुतांश उमेदवारांना पक्षाने पुन्हा तिकीट दिले आहे. 29 उमेदवारांच्या यादीत 13 उमेदवारांची पुनरावृत्ती झाली आहे, तर 16 उमेदवारांची तिकिटे बदलण्यात आली आहेत.

संसदेत दानिश यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी 

भाजप नेते रमेश बिधुरी हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. 21 सप्टेंबर 2023 रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केली होती. याबाबत दानिश अली यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रारही केली होती. भाजपने रमेश बिधुरी यांच्या वक्तव्याचा निषेध करत तत्कालीन खासदार बिधुरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी दानिश यांच्यावर आरोप करत बसपा खासदाराने पीएम मोदींविरोधात अपशब्द वापरल्याचं म्हटलं होतं.  

AAP ने सर्व 70 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत

आम आदमी पार्टी (AAP) ने 15 डिसेंबर रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांची घोषणा केली होती. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून निवडणूक लढवणार आहेत. कालकाजीमधून सीएम आतिशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सौरभ भारद्वाज ग्रेटर कैलासमधून तर सत्येंद्र जैन हे शकूर बस्तीमधून निवडणूक लढवणार आहेत.

काँग्रेसच्या तीन याद्या जाहीर, 48 उमेदवार जाहीर

काँग्रेस महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा कालकाजी मतदारसंघातून दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी शुक्रवारी त्यांच्या नावाची घोषणा केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत 3 यादीत 48 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget