एक्स्प्लोर
पत्नीला किस करणं महागात, पतीची तुरुंगात रवानगी
रांची : पत्नीच्या मनाविरुद्ध तिचा किस घेणं एका पतीला चांगलंच महागात पडलं आहे. झारखंडच्या पाकुडमध्ये नसीपूर गावातील तरुणीने थेट पोलिसात तक्रार केली आणि पतीवर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली आहे.
संबंधित तरुणी लग्नानंतर पती डालिम शेखसोबत नसीपूर गावात राहायला आली. तीन वर्षांपर्यंत दोघांमध्ये चांगले संबंध होते. मात्र त्यानंतर त्यांच्या नात्यात कटुता आली. चार महिन्यांपूर्वी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तरुणी माहेरी राहण्यासाठी गेली.
एके दिवशी अचानक पती डालिम शेख तिच्या माहेरी आला. गप्पांमध्ये गुंगवून त्याने अचानक तिला किस केलं. संसाराला पुन्हा सुरुवात करण्याचा डालिमचा हेतू होता, मात्र लहान-सहान गोष्टींचं भांडवल करुन घटस्फोट घेतल्याचा राग पत्नीच्या मनातून गेला नव्हता.
घटस्फोटित पतीने जबरदस्ती घेतलेल्या किसमुळे तिचा पारा चढला. तिने थेट पोलिसांमध्ये डालिमची तक्रार केली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यामुळे त्याची रवानगी थेट तुरुंगात करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement