Gujrat Fire : गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीला भीषण आग, 700 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं
Vadodara Fire : वडोदरा येथील केमिकल फॅक्टरीमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
![Gujrat Fire : गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीला भीषण आग, 700 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं huge explosion fire at chemical company in gujarat vadodara video marathi news Gujrat Fire : गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीला भीषण आग, 700 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/f13f6a5f5cd78eb1990ef23677852091_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gujrat Chemical Factory Fire : गुजरातमधील वडोदरा येथील केमिकल कंपनीत भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. वडोदरा शहराबाहेरील नंदेसरी औद्योगिक क्षेत्रातील दीपक नायट्रेट रासायनिक उत्पादन प्रकल्पाच्या एका भागात गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांनी सांगितलं की, सात जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून कारखान्याच्या आसपास राहणाऱ्या सुमारे 700 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
700 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं
वडोदरा जिल्हा दंडाधिकारी आर. बी. ब्रार यांनी सांगितले की, भीषण आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीमुळे धुराच्या लोट पसरले. यामध्ये पडलेल्या सात जणांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. खबरदारी म्हणून कारखान्याजवळील ग्रामीण भागात राहणाऱ्या सुमारे 700 लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आलं आहे.
#WATCH | Huge explosion, followed by fire, occurs at Deepak Nitrite Company in Nandesari GIDC in Vadodara, Gujrat. Details awaited. pic.twitter.com/xNd55HJv9P
— ANI (@ANI) June 2, 2022
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
वडोदरा अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, संध्याकाळी जेव्हा कारखान्यात आग पसरू लागली तेव्हा एक मोठा स्फोटही झाला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचंही त्यांनी सांगितलं. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Coronavirus : चिंता वाढली! देशात 11 मार्चनंतर सर्वाधिक कोरोनाबाधित, 4 हजार 41 नव्या रुग्णांची नोंद
- Sidhu Moose Wala Postmortem : सिद्धू मुसेवाला यांच्या किडनी, यकृतासह 19 ठिकाणी गोळ्यांच्या जखमा, पोस्टमॉर्टम अहवालातून उघड
- Today Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)