एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिल्लीतल्या हिंसाचाराची केंद्राकडून गंभीर दखल, अमित शाह आणि केजरीवाल यांच्यात बैठक
दिल्लीतील बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर आणि सोशल साईटवर गृह मंत्रालयालाला बारीक नजर ठेवण्याचे आदेश दिले आहे.
नवी दिल्ली : सीएएवरून राजधानी दिल्लीतील काही भागांमध्ये उफाळलेल्या हिंसाचराची धग आजही कायम आहे. अनेक ठिकाणी मंगळवारी (25 फेब्रुवारी) सकाळी देखील आंदोलक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी सकाळी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर आणि सोशल साईटवर गृह मंत्रालयालाला बारीक नजर ठेवण्याचे आदेश दिले आहे.
या वेळी पक्षीय राजकारण सोडून दिल्लीत शांतता आणण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न करणार असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी बैठकीनंतर सांगितलं आहे. तर दिल्लीत शांतता राखली जावी यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल राजघाटवर गेले होतो. केजरीवाल यांनी महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावर जाऊन प्रार्थना केली.
शांतता समितीची स्थापना करण्याचे आदेश
गृहमंत्री अमित शाह यांनी शांतता समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले आहे. पोलिस आणि स्थानिक आमदारांनी समन्वय साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी निवडूण दिलेल्या प्रतिनिधींच्या सूचनेनुसार पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच हिंसा झालेल्या भागांमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्विलन्स आणि ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचे आदेश दिले आहे.
निमलष्करी दलाची मदत
गृहमंत्र्यांनी दिल्लीतील हिंसा रोखण्यासाठी निमलष्करी दलाची मदत घेतली जाणार आहे. पोलिसांच्या मदतीसाठी निमलष्करी दल वाढवले जाणार आहे. तसेच हिंसा आणि अफवा पसरवणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहे.
राजघाटावर गांधींजींना अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दिल्लीतील गुरु तेग बहादूर रुग्णालयात पोहोचले. शहरातील हिंसाचारात जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार सुरु आहेत. या नागरिकांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. Delhi Riots | दिल्लीतील हिंसाचारावर मुख्यमंत्री केजरीवाल आणि गृहमंत्री अमित शाह यांची संयुक्त बैठक संबंधित बातम्या : Delhi Riots | हिंसेनंतर मेट्रो स्टेशन बंद, शाळांना सुट्टी; गोळीबार करणारा ताब्यात राजधानीत CAA समर्थक, विरोधकांमध्ये हिंसाचार; उत्तर-पूर्व दिल्लीत जमावबंदीDelhi CM Arvind Kejriwal, deputy CM Manish Sisodia and other Aam Aadmi Party (AAP) leaders at Raj Ghat. pic.twitter.com/wi7asYUVFk
— ANI (@ANI) February 25, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement