Holi 2022 : बीएसएफ जवानांकडूनही रंगांची उधळण; गाणी गात, नाचत होळी साजरी
Holi 2022 : जम्मूच्या गजानसू भागात बीएसएफच्या जवानांनी एकमेकांना रंग लावून गाणी गाऊन जोरदार नाच करत सैनिकांची होळी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
Holi 2022 : देशभरात रंगपंचमी उत्साहात साजरी केली जात आहे. जम्मू आणि काश्मीरमधील सैनिक आनंदात रंगपंचमी सण साजरा करत आहेत. जम्मू-काश्मीरमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफ जवानांनी होळी खेळली. जम्मूच्या गजानसू भागात बीएसएफच्या जवानांनी एकमेकांना रंग लावले, गाणी गायली आणि जोरदार डान्स केला. सैनिकांची होळी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
Jammu and Kashmir | BSF personnel celebrate Holi with colours along with singing songs and dancing in Gajansoo area of Jammu pic.twitter.com/2lVyqiANUp
— ANI (@ANI) March 17, 2022
पंजाबमधील अमृतसर येथील अजनाला मुख्यालयात बीएसएफच्या 73 बटालियन (BN) जवानांनी होळी खेळली. यादरम्यान एका बीएसएफ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही प्रत्येक सण कुटुंबाप्रमाणे साजरा करतो. तर राजस्थानमधील जैसलमेरमध्ये रंगांची होळी खेळताना बीएसएफचे जवान गाण्याच्या तालावर जोरदार नाचताना दिसले.
बीएसएफच्यावतीने ट्विट करत देशवासियांना धुलिवंदनाच्या शुभेच्छा आहेत. ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'सर्व देशवासियांना महासंचालक, सीमा सुरक्षा दल आणि सर्व सीमा रक्षकांच्या वतीने होळीच्या शुभेच्छा. सीमा सुरक्षा दल - सदैव सतर्क'
महानिदेशक, सीमा सुरक्षा बल और समस्त सीमा प्रहरियों की ओर से सभी देशवासियों को होली की हार्दिक शुभकामनाएं।
— BSF (@BSF_India) March 18, 2022
सीमा सुरक्षा बल - सर्वदा सतर्क #HappyHoli #HappyHoli2022 #BSF pic.twitter.com/qTMnUM5J3N
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ISKCON Temple Attack : बांगलादेशमधील इस्कॉन मंदिरावर हल्ला, जमावाकडून तोडफोड आणि लूटमार, अनेक जण जखमी
- China Corona : चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, चीनमध्ये शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी अडचणीत
- Viral Video : सायकल चालवत मुलानं काही सेकंदात सोडवलं रुबिक्स क्यूब, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha