Karnataka Rain : बंगळुरुमध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, वाहतुकीवर परिणाम, दोन किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम
कर्नाटक (Karnataka Rain) राज्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून, वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
Karnataka Rain : सध्या देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटक (Karnataka Rain) राज्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून, वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. बंगळुरुच्या (Bengaluru) अनेक भागात रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळं वाहतूक ठप्प झाली असून साधारणत: दोन किलोमीटर अंतरापर्यंत ट्रॅफिक जाम झाला आहे.
कर्नाटक राज्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळं बंगळुरु शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता बंगळुरु पाणी पुरवठा मंडळानं व्यक्त केली आहे. दरम्यान, मंडळाने तात्पुरत्या स्वरुपात मोफत टँकरची व्यवस्था केली आहे. ज्या भागात नळाच्या पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला आहे, त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.
सात सप्टेंबरपर्यंत बंगळुरुमध्ये पावसाचा यलो अलर्ट
बंगळुरुमधील मराठाहल्ली हे आयटी कंपन्यांचे केंद्र आहे. त्याठिकाणी देखील मुसळदार पावसामुळं ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळं त्या ठिकाणी नोकरीला असणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर शक्य असेल पाणी असलेल्या ठिकाणाहून वाहतूक टाळावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. राजधानी बेंगळुरुसह कर्नाटकात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सात सप्टेंबरपर्यंत बंगळुरुमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगितले आहे.
कर्नाटक राज्यात आत्तापर्यंत 820 मिमी पावसाची नोंद
दरम्यान, 1 जूनपासून कर्नाटक राज्यात 820 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळं 27 जिल्हे आणि 187 गावे प्रभावित झाली आहेत. 29 हजार 967 नागरिकांना या पावसाचा फटका बसला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात नऊ मिमी पावसाची नोंद झाली असून, रामनगरा, चामराजनगरा आणि मंड्या जिल्ह्यातील 20 गावांमध्ये 3,000 लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रहिवासी भागात पाणी साचल्यानंतर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यातील मागील सरकारांवर बंगळुरुकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: