एक्स्प्लोर
UPI वर चार्जचा निर्णय मागे, एचडीएफसीचा ग्राहकांना दिलासा

नवी दिल्ली : एचडीएफसी बँकने 10 जुलैपासून यूपीआय व्यवहारांवर चार्ज लावण्याचा निर्णय मागे घेतला आहे. एचडीएफसीने ई-मेलद्वारे 10 जुलैपासून यूपीआयच्या व्यवहारांवर चार्ज लावणार असल्याची माहिती ग्राहकांना दिली होती. 10 जुलैपासून खातेधारकांना 1 रुपया पासून 25 हजार रुपयांपर्यंतच्या यूपीआय ट्रांझॅक्शनवर 3 रुपये चार्ज अधिक सर्विस टॅक्स द्यावा लागणार होता. तसंच 25 हजार आणि 1 लाखांपर्यंतच्या व्यवहारावर 5 रुपये चार्ज द्यावा लागणार होता. यूपीआय म्हणजे काय?
- यूपीआई म्हणजेच यूनीफाइड पेमेंट इंटरफेस (Unified Payment Interface) पैसे पाठवण्याचा नवा मार्ग आहे. NEFT, RTGS आणि IMPS सिस्टमद्वारे पैसे पाठवण्यापेक्षा यूपीआय जास्त सोपा मार्ग आहे.
- प्रत्येक बँकेचं यूपीआय अप आहे. ज्यावर युनिक आयडी आणि यूपीन सेट करून पैशांची देवाणघेवाण केली जाते. यावरून पैसे पाठवतांना दुसऱ्या व्यक्तीच्या खात्याबद्दलची माहिती म्हणजे अकाउंट नंबर, शाखेचं नाव, खातेधारकाचं नाव अशी माहिती असणं आवश्यक नाही.
- तुम्हाला एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असतील आणि त्यासाठी त्याला खाते क्रमांक सांगायचा नसेल तर यूपीआय उत्तम माध्यम आहे.
- यूपीआयद्वारे खाते क्रमांक जाणून न घेताही पैसे पाठवता येतात. कारण याद्वारे बँक खात्याशिवाय वर्च्युअल पेमेंट अड्रेसद्वारेही (VPA) पैसे पाठवता येतात.
Before You Go
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

नरेंद्र बंडबे
Opinion




















