एक्स्प्लोर

Haryana Elections Results 2024: भाजपने अशक्य ते शक्य करुन दाखवलं? हरियाणात 50 जागांवर आघाडी, तिसऱ्यांदा भगवं सरकार येणार?

Haryana Vidhan Sabha Election Result 2024: हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, आतापर्यंतच्या सर्वाधिक जागा. जाट आणि शेतकरी आंदोलकांच्या विरोधावर ओबीसी कार्डचा उतारा

चंदीगढ: हरियाणा विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोल्स आणि राजकीय पंडितांचे अंदाज चुकवत भाजप पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. हरियाणात आजपर्यंत विधानसभेच्या दोन टर्मनंतर कोणत्याही पक्षाचे सरकार तिसऱ्यांदा निवडून आलेले नाही. मात्र, मतमोजणीचे सध्याचे कल पाहता भाजप हरियाणात (Haryana Elections Results 2024) तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची किमया साधू शकतो. शेतकरी आंदोलन आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे देशव्यापी नाचक्की झाल्यामुळे हरियाणातील परिस्थिती भाजपसाठी (BJP) प्रतिकूल मानली जात होती. मात्र, ही सगळी आव्हाने झुगारत भाजप सध्या दमदारपणे सत्तेच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. 

सकाळी 11 वाजेपर्यंतच्या मतमोजणीच्या कलानुसार 90 जागा असलेल्या हरियाणा विधानसभेत भाजप 48, काँग्रेस 36, लोक दल 1 आणि 5 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. हरियाणा विधानसभेत 46 ही मॅजिक फिगर आहे. त्यामुळे भाजपकडे एकहाती बहुमत आहे. पुढील काही तासांमध्ये भाजपच्या जागा घटल्या तरी त्यांना अपक्षांची मदत मिळू शकते. आघाडीवर असलेल्या अपक्ष उमेदवारांपैकी बहुतांश भाजपचे बंडखोर आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी गरज पडल्यास हे बंडखोर भाजपलाच साथ देतील, असा अंदाज आहे. त्यामुळे या क्षणापर्यंत हरियाणात भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. भाजपने हरियाणात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यास देशभरातली विशेषत: महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला काहीसा फटका बसला होता. मात्र, हिंदी पट्ट्यातील हरियाणात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यास भाजप कार्यकर्त्यांच्या मनातील निराशेचे मळभ दूर होण्यास मदत होऊ शकते.

या विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी सुरुवातीपासूनच प्रतिकूल वातावरण असल्याची चर्चा होती. शेतकरी आणि जाट मतदार भाजपविरोधात जातील, असा अंदाज होता. त्यासाठी भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री बदलला होता. मनोहरलाल खट्टर यांच्याऐवजी नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आले होते. या माध्यमातून जाट मतदार वगळून ओबीसींची मोट बांधण्याची भाजपची रणनीती होती. ही रणनीती यशस्वी ठरताना दिसत आहे. 

मात्र, त्याचवेळी दुसऱ्या बाजूला अनुकूल परिस्थिती असताना काँग्रेसला आलेले अपयश चर्चेचा विषय ठरणार आहे. हरियाणातील अपयशामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. हरियाणातील काँग्रेसचा पक्षातंर्गत संघर्ष पराभवासाठी कारण ठरला का, हे आता पाहावे लागेल. भाजपला यंदाच्या निवडणुकीत हरियाणात सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी भाजपला हरियाणात इतक्या मोठ्याप्रमाणावर यश मिळाले नव्हते. 

आणखी वाचा

काँग्रेसने फटाक्यांची वात काढण्यापूर्वीच हरियाणात गेम फिरला, भाजपची जोरदार मुसंडी, तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitish Kumar Reddy : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
Video : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंटल तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल
अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंटल तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल
संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 
संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 06 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्सCM Fadanvis On Eknath Shinde : गृहखात्याविषयी रस्सीखेच नव्हती, शिंदे नाराज नाहीत - फडणवीसUday Samant On Mahayuti : एकनाथ शिंदे आम्हाला अपेक्षित मंत्रिपदं देतील- उदय सामंत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitish Kumar Reddy : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
Video : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंटल तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल
अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंटल तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल
संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 
संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 
Maharashtra Weather Update: दरवर्षीपेक्षा राज्यात यंदा कमी प्रमाणात थंडी; शेतकर्‍यांनाही सतर्कतेचा इशारा, काय म्हणाले हवामान शास्त्रज्ञ?
दरवर्षीपेक्षा राज्यात यंदा कमी प्रमाणात थंडी; शेतकर्‍यांनाही सतर्कतेचा इशारा, काय म्हणाले हवामान शास्त्रज्ञ?
शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र; शाहू महाराज भाजपवर संतापले, कोल्हापुरात आंदोलनात उतरले
हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र; शाहू महाराज भाजपवर संतापले, कोल्हापुरात आंदोलनात उतरले
Pakistani Shah Rukh Khan : पाकिस्तानचा 'शाहरुख खान' कोणाला समजंल जातं? भारतीय पुरस्कार जिंकणारा एकमेव अभिनेता!
पाकिस्तानचा 'शाहरुख खान' कोणाला समजंल जातं? भारतीय पुरस्कार जिंकणारा एकमेव अभिनेता!
Embed widget